मुंबई/प्रतिनिधी ः गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मुंबईमध्ये बॉम्बस्फोट करण्याची धमकी देण्याचे प्रकार समोर येत आहे. यातील बर्याचशा अफवा दिसून

मुंबई/प्रतिनिधी ः गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मुंबईमध्ये बॉम्बस्फोट करण्याची धमकी देण्याचे प्रकार समोर येत आहे. यातील बर्याचशा अफवा दिसून येत आहे, तर काही धमक्या या पाकिस्तान किंवा परदेशातून देण्यात येत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यानंतर बुधवारी देखील मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट करण्याची धमकी देण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आरोपीने फोन करून धमकीचा मेसेज केला असून त्यानंतर आता पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. आरोपीने मुंबईतील नागपाडा परिसरात बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली असून पोलिसांनी नंबरवरून आरोपीला ट्रेस करत त्याला अटक केली आहे.
दिलीप राऊत असे धमकी देणार्या आरोपीचं नाव असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईत पुन्हा एकदा बॉम्बस्फोट करण्याची धमकी देण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या नियंत्रओण कक्षाला बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणारा मेसेज आला होता. आरोपी दिलीप राऊत याने मुंबईतील नागपाडा परिसरात साखळी बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर मुंबई पोलीस आणि बॉम्बशोधक व नाशक पथकाने तातडीने नागपाड्यातील गर्दीच्या ठिकाणी धाव घेतली. संपूर्ण परिसराची तपासणी केल्यानंतर पोलिसांना कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नव्हती. तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी दिलीप राऊत याला नायर रुग्णालय परिसरातून अटक केली आहे. धमकीच्या मेसेजनंतर आरोपीला अटक करण्यात आल्याने मुंबईकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
COMMENTS