Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लसीचे दोन डोस घेणार्‍यांनाचा महाविद्यालयात प्रवेश : ना. उदय सामंत

कराड / प्रतिनिधी : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बंद असलेली राज्यातील महाविद्यालये एक फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. कोरोना प्रतिबंध लसीचे दोन डोस घे

विकास कामांमुळे कॉलर उडविणार्‍यांचा लोकसभेला पराभव : सारंग पाटील
शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीमध्ये 15 कोटींची वाढ; महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या पाठपुराव्याला यश
महाविकास आघाडीची विकास पताका घेऊन धावल्या कोयना-महाराष्ट्र एक्सप्रेस

कराड / प्रतिनिधी : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बंद असलेली राज्यातील महाविद्यालये एक फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. कोरोना प्रतिबंध लसीचे दोन डोस घेणार्‍या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश दिला जाईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. स्थानिक पातळीवरील कोरोना संसर्गाची स्थिती पाहून महाविद्यालये सुरू करावीत. विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी शिबीरे घ्यावीत, याबाबतचे अधिकार स्थानिक जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत, अशी माहिती मंत्री सामंत यांनी कराड येथे पत्रकार परिषदेत दिली.
ना. सामंत म्हणाले, राज्यात कोरोना स्थितीमुळे 15 फेब्रुवारीपर्यंत परीक्षा ऑनलाईन घेतल्या जाणार आहेत. 15 फेब्रुवारीनंतर राज्यातील कोरोनाचा आढावा व कुलगुरूंशी चर्चा करून पुढील परीक्षांबाबत निर्णय घेतला जाणार आहे. एक फेब्रुवारीपासून सर्व महाविद्यालये सुरू होणार आहेत. कोरोना प्रतिबंध लसीचे दोन डोस पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या लस घेतलेल्या नाहीत. त्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जाईल. कराडच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात लसीकरणाची स्थिती चांगली आहे. एक हजार 685 विद्यार्थ्यांपैकी 70 टक्के लसीकरण पूर्ण आहे.
विद्यार्थ्यांचे आठ दिवसात 100 टक्के लसीकरण होण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांना सूचना केल्या आहेत. खासगी महाविद्यालयांसाठी लसीकरणाची मोहीम राबवून विद्यार्थ्यांचे 100 टक्के लसीकरण झाले पाहिजे. राज्यातील पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या स्थानिक विकास निधी खर्चाच्या अधिकाराबाबत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत प्राचार्यांच्या अधिकारातील खर्चामर्यादा 50 हजारावरून तीन लाख, जॉईंट डायरेक्टरांच्या अधिकारातील दोन लाखावरून पाच तर डायरेक्टरांच्या अधिकारातील खर्चाची मर्यादा तीन लाखावरून दहा लाखापर्यंत वाढविण्यात आल्या आहेत. मात्र त्या खर्चाचे व कामाचे ऑडिट होणार आहे.
महाविद्यालयात कंत्राटी कर्मचार्‍यांना किमान वेतन देण्यात येणार आहे. महाविकास आघाडीने सरकारने महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचार्‍यांसाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यात ऑऊट सोर्सिंगमधील सफाई व शिपाई कर्मचार्‍यांना किमान वेतन देण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांच्या सद्याच्या पगारामध्ये चार हजरांची वाढ होणार आहे. येथे महाविद्यालयातील 43 कर्मचार्‍यांना त्याचा लाभ होणार आहे. त्याची अंमलबजावणी एक एप्रिलपासून होणार आहे. जानेवारी ते मार्च असा फरकही दिला जाणार आहे.

COMMENTS