पाठीत खंजीर खुपसणार्‍यांनी पूजा न करण्याची नैतिकता पाळावी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाठीत खंजीर खुपसणार्‍यांनी पूजा न करण्याची नैतिकता पाळावी

नगरच्या उपजिल्हा प्रमुखाचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

अहमदनगर/प्रतिनिधी : आपण सामान्य शिवसैनिक आणि पक्षप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसून जी सत्ता मिळवली, ती नैतिकतेला धरून नाही. त्यामुळे आपण आषाढी एकादशीला

शिवसेनेनं बेईमानी करत मुख्यमंत्रिपदाची भूमिका सांगितली आणि भाजपशी युती तोडली
पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेला मोठा झटका… नेत्यासह असंख्य कार्यकर्ते भाजपात
शिवसेना नेत्यांच्या चौकशांना लागणार ब्रेक..? उद्धव ठाकरे-अमित शहांची होणार भेट

अहमदनगर/प्रतिनिधी : आपण सामान्य शिवसैनिक आणि पक्षप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसून जी सत्ता मिळवली, ती नैतिकतेला धरून नाही. त्यामुळे आपण आषाढी एकादशीला पंढरपूरला पांडुरंगाच्या दरबारी जाऊन शासकीय महापूजा करू नये व आमच्या आराध्याची फसवणूक करू नये असे आवाहन शिवसेनेचे नगर जिल्हा उपप्रमुख गिरीश जाधव यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केले आहे.
यासंदर्भात जाधव यांनी पत्रक प्रसिद्धीला दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, शिवसेनेची पक्षशिस्त मोडून व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेश झुगारून बंडखोर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांची खुर्ची मिळवली तरी सभागृहातील बहुमत ग्राह्य धरायचे की नाही याबाबत सर्वोच्च्य न्यायालयात एक याचिका प्रलंबित आहे. या याचिकेची सुनावणी येत्या 11 जुलै रोजी होणार आहे. तत्पूर्वी आपण मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन पदभार देखील स्वीकारला, परंतु न्यायालयाचा निकाल अद्याप येणे बाकी असल्याने नैतिकतेच्या मुद्द्यावर आपण येत्या आषाढी एकादशीला मुख्य शासकीय पूजा करण्यासाठी जाऊ नये असे आवाहन करून पुढे म्हटले आहे की, मुख्यमंत्री शिंदे यांनी भाजपशी हातमिळवणी करीत सत्ता मिळवली असली तरी ते बंडखोर आहेत. त्यांनी पक्षाची शिस्त मोडली आहे. त्यांना मदत करणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या कंपूने आमचे दैवत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना बदनाम करणारी वक्तव्ये केली. आमच्या शिवसैनिक आमदारांच्या मागे इडीचा ससेमिरा लावला आणि शिवसेनेतील एक गट फोडून सत्ता काबीज केली. पण, प्रत्यक्षात ओरिजिनल शिवसैनिक आम्ही असून, जे गेले ते कावळे आहेत आणि आम्ही उरलेले शिवसेनेचे खरे मावळे आहोत आणि त्यांचे मुख्यमंत्रीपद कायम राहणार की नाही याचा फैसला येत्या 11 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. तोपर्यंत शिंदे यांनी मुख्य शासकीय पूजेसाठी पंढरपूरला जाऊ नये. सर्वोच्य न्यायालयाचा न्यायनिवाडा पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना मुख्यमंत्री मानणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. शिवसेना हा एक शिस्त असलेला पक्ष आहे. शिवसेनेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शब्द प्रमाण आणि अंतिम मानला जातो. मागील अडीच वर्षात शिंदे यांनी उद्धव ठाकरेंबरोबर खांद्याला खांदा लावून काम केले. सुखात चाललेला तीन पक्षांचा संसार मोडण्यासाठी भाजपाने अमाप पैसे ओतले. ईडी, सीबीआय आणि आयटीच्या कारवायांचा ससेमिरा शिवसेनेच्या आमदार आणि मंत्र्यांच्या मागे लावला आणि सत्त्तांतर घडवून आणले. पण हे बेकायदेशीर असून हे सरकार आम्हाला मान्य नाही. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी पंढरपूरला जाऊन पूजा करू नये, जे नैतिकतेला धरून नाही, असे स्पष्ट करून जाधव यांनी म्हटले आहे की, सरकार पाडण्यासाठी गनिमी काव्याचा वापर केल्याची वक्तव्ये केली जात आहेत. पण छत्रपती शिवाजी महाराज यांनी गनिमी कावा शत्रुपक्षाला जेरीस आणण्यासाठी वापरला. मात्र, आपण हा गनिमी कावा आपल्याच पक्षाशी गद्दारी करण्यासाठी आणि खुर्ची मिळवण्यासाठी वापरला, हे एक कटू सत्य आहे. व्यक्तीपेक्षा पक्ष कधीपण मोठाच असतो. पैसा, धाकदपटशा आणि छलकपट करून आपण सत्ता मिळवली खरी पण ही सत्ता सामान्य शिवसैनिक आणि पक्षप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसून मिळवली व जी नैतिकतेला धरून नाही. त्यामुळे आपण आषाढीला पांडुरंगाच्या दरबारी जाऊन आमच्या आराध्याची फसवणूक करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

पहिला झळकला फलक
विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेत फोडाफोडीचे राजकारण सुरु झाल्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आमचा पाठिंबा असल्याचे फलक गिरीश जाधव यांनी सर्वप्रथम नगर शहरात लावले होते आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे व शहर प्रमुख संभाजी कदम यांनीही ठाकरेंच्या समर्थनार्थ असे फलक लावले होते.

COMMENTS