Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इस्लामपूरातील प्रभाग 11 मध्ये काट्याच्या लढती…?

राजकीय वातावरण तापले; राष्ट्रवादीतील गटबाजी उफाळणारइस्लामपूर / प्रतिनिधी : येथील प्रभाग 11 मध्ये राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये काटा लढतीचे संकेत असल्

देहदानाचा निर्णय समाजास दिशादर्शक राहील
प्राध्यापक पदांच्या भरतीसाठी एमपीएससीकडून अधिसूचना
अर्थसंकल्पातील विकासाची पंचसूत्री राज्याला प्रगतीपथावर नेईल : ना. मंत्री जयंत पाटील यांचा विश्‍वास

राजकीय वातावरण तापले; राष्ट्रवादीतील गटबाजी उफाळणार
इस्लामपूर / प्रतिनिधी : येथील प्रभाग 11 मध्ये राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये काटा लढतीचे संकेत असल्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे . उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील यांच्यासमोर विकास आघाडीचे अजित पाटील यांनी मोठे आव्हान उभे केले आहे. त्यातच डांगे गटाचे सुरज पाटील व माजी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांचे चिरंजीव सुरज पाटील यांनीही मोर्चे बांधणीला सुरूवात केली आहे. भाजपने या प्रभागात ताकद लावली असताना राष्ट्रवादीत गटबाजी उफाळू लागली आहे.
राजारामबापूंच्यावर प्रेम व निष्ठा असणारे असंख्य कार्यकर्ते आहेत. त्याचप्रमाणे उरुण परिसरातील दिवंगत पै. चंद्रकांत पाटील हे माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांचे निष्ठावंत होते. गत पालिका निवडणुकीवेळी राष्ट्रवादीच्या चिन्हावर पै. चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक लढवली होती. मात्र, पक्षांतर्गत गटबाजीचा फटका चंदू आबांना बसल्याची चर्चा होती. हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला होता. निवडणुकीत अपक्ष उमेदवार दादासाहेब पाटील यांनी नमस्कार करत चमत्कार केला. ते राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून उपनगराध्यक्ष झाले. गत पराभवाचे उट्टे काढण्यासाठी चंद्रकांत पाटील यांचे पुतणे सुरज पाटील व चिरंजीव सुमित पाटील यांनी कंबर कसली आहे.
राजारामबापू बँकेचे अध्यक्ष शामराव पाटील यांचे चिरंजीव व राष्ट्रवादीचे खजिनदार शैलेश पाटील यांनी गतवेळी उमेदवारी मागितली होती. मात्र, मंत्री पाटील यांनी त्यांची उमेदवारी नाकारली. शैलेश पाटील यांनी पक्षाच्या माध्यमातून काम ही सुरू केले आहे. परंतू राजारामबापू कारखान्याचे माजी संचालक शंकर पाटील (आबा), आनंदराव पाटील (आप्पा), महादेव पाटील (कारभारी), एम. जी. पाटील यांच्या बरोबर उमेदवारीसाठी झगडावे लागणार आहे. शामराव पाटील हे मंत्री पाटील यांचे निकटवर्तीय असल्याने शैलेश पाटील यांना उमेदवारी दिली जाणार अशी चर्चा आहे.
आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तिकीट कोणाला मिळणार? याबाबत सर्वच इच्छुक उमेदवारांच्यात कमालीची उत्सुकता आहे. गतवेळी प्रभाग 11 मध्ये डांगे गटाचे चंद्रकांत पाटील व सौ मनीषा पाटील यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे पै. चंद्रकांत पाटील यांचे पुतणे सुरज पाटील व उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांचे चिरंजीव सुरज पाटील हे प्रभागात सक्रिय झाले आहेत. याच प्रभागातील पोलीस पाटील बाळासाहेब पाटील यांचे बंधू संजय पाटील (धनी) यांनी ही प्रभाग 11 व 12 या दोन प्रभागातील आपले समर्थक कामाला लावून मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. मंत्री जयंत पाटील जो आदेश देतील त्या आदेशाची अंमलबजावणी करणे असे त्यांनी ठरवले आहे.
एकूणच प्रभाग 11 मधील विकास आघाडीचे उमेदवार अजित पाटील यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात आहे. परंतू राष्ट्रवादीकडून उमेदवारी कोणाला मिळणार? हे अजून अनिश्‍चित असले तरी इच्छुकांमधून मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रभाग 11 मधील राजकीय वातावरण तापले आहे.

COMMENTS