संगमनेर( प्रतिनिधी) तालुक्यातील वाडीवस्तीवर विकासाच्या योजना पोहोचविण्याबरोबर विद्युतीकरणाचे जाळे अधिक सक्षम करताना वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी राज
संगमनेर( प्रतिनिधी) तालुक्यातील वाडीवस्तीवर विकासाच्या योजना पोहोचविण्याबरोबर विद्युतीकरणाचे जाळे अधिक सक्षम करताना वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून संगमनेर तालुक्यात मेगाएंपियरचे पाच पावर ट्रांसफार्मर मंजूर झाले असल्याची माहिती थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजितभाऊ थोरात यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना थोरात म्हणाले की, कोरोना संकटातही नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील विविध विकासाच्या योजनांसाठी सातत्याने निधी मिळवला आहे .या अगोदर रस्ते दुरुस्ती कामासाठी नामदार थोरात यांच्या माध्यमातून 17 कोटी रुपयांचा निधी मिळाला. आता नव्याने गावोगावचे विद्युत जाळे अधिक मजबूत करताना व विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी मेगा होल्ट एंपियर चे पाच नवीन ट्रांसफार्मर मिळाले आहेत. यामुळे तालुक्यातील ऊर्जा विषयक पायाभूत सुविधा अधिक मजबूत होणार आहे. . यामुळे तळेगाव, वरझडी खु. वरझडी बु. कासारे, करुले ,कवठे कमळेश्वर, ओझर खु. रहिमपूर ,कोकणगाव, शिवापूर, मेंढवन येथील गावांना वीज पुरवठा सुरळीत होण्यास अधिक मदत होणार आहे होऊन तर पिंपरणे निंबाळे व देवगाव येथील एमएसईबी च्या विद्युत सबस्टेशन मध्ये मेगा होल्ट एंपियर चे 5 पावर ट्रांसफार्मर बसवले जाणार आहे. यामुळे खंडित होणारा पुरवठा सुरळीत होऊन चांगल्या दाबाने वीज पुरवठा होणार आहे .याचा लाभ पिंपरणे ,मालुंजे, खराडी, जाखुरी, कोळवाडे, डिग्रस ,आंबोरे ,निंबाळे, कोळेवाडे, जोर्वे ,समनापुर, देवगाव, रायते ,रायतेवाडी, हिवरगाव पावसा या गावांना होणार आहे..
गावोगावी विद्युतीकरणाचे मजबूत जाळे होणार असल्याने या गावांमधील नागरिकांना सुरळीत वीज पुरवठा होण्यास मदत होणार आहे यामुळे या विविध गावांमधील नागरिकांमध्ये व शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या कामासाठी यशोधन कार्यालयाचा मोठा पाठपुरावा झाला असून विद्युत विभागाचे मोठे सहकार्य मिळाले आहे.
COMMENTS