Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जळीत झालेल्या वारे कुटुंबीयांना थोरातांकडून मदत

संगमनेर: काँगे्रस नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन कार्यालयाच्या माध्यमातून जांबूत येथील जळीत झालेल्या वारे कुटुंबीयांना संसार उपयो

जुनी पेन्शन योजना लागू करावी, 29 रोजी ठिय्या आंदोलन
मित्राने आमच्याशी गद्दारी केली आहे, आमची मान कापली आहे…
अहमदनगरच्या राहता तालुक्यात ट्रकचा भीषण अपघात

संगमनेर: काँगे्रस नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन कार्यालयाच्या माध्यमातून जांबूत येथील जळीत झालेल्या वारे कुटुंबीयांना संसार उपयोगी साहित्य, किराणा व घरगुती वापराची भांडी देऊन मदत करण्यात आली. जांबुत येथे वारे कुटुंबीयांची भेट देऊन त्यांना किराणा भांडी व घरगुती साहित्य देण्यात आले. यावेळी सभापती शंकर पा खेमनर, यशोधन कार्यालयाचे आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात, तर वारे कुटुंबीयांच्या सिंधुबाई वारे, ताई वारे, देवराम मेंगाळ आदी उपस्थित होते.
बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने गोरगरिबांसाठी अनेक विकासाच्या योजना राबवल्या आहेत. तालुक्यातील जनतेसाठी आमदार बाळासाहेब थोरात हे कायम आधारवड ठरले असून वारे कुटुंबीयांच्या घराला लागलेल्या आगीत त्यांचे गृह उपयोगी सर्व साहित्य जळून खाक झाले यावेळी त्या घरामध्ये झोपलेली दोन बालके रवींद्र बर्डे या युवकाने प्रसंगावधान राखून या आगीतून बाहेर काढत या बालकांचा जीव वाचवला. घटनेचे वृत्त समजतात लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात ही मुंबईत असून सुद्धा तातडीने यशोधन कार्यालयास त्यांनी सूचना दिल्या व या कुटुंबीयांना मदतीसाठी किराणा व इतर साहित्य पाठवले. माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांनी या कुटुंबाला संसार उपयोगी भांडी यांची मदत केली. तर आदिवासी सेवक प्रा बाबा खरात म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी गोरगरिबांची कायम सेवा केली त्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून दिला आणि या तालुक्यातील सर्व जनता आमदार थोरात यांच्याच पाठीशी उभी आहे. मागील आठवड्यात झालेला निकाल अनपेक्षित होता मात्र जनता ही आमदार थोरात यांच्याच पाठीशी आहे आणि गोरगरिबांच्या मदतीसाठी बाळासाहेब थोरात हेच सदैव तत्पर राहणार असल्याचे ते म्हणाले. तर देवराम मेंगाळ म्हणाले की, माझ्या घरकुल, रेशन कार्ड व इतर कामांसाठी लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी कायम मदत केली आहे. त्यांचे कार्यकर्ते ही कायम मदत करतात .अशा संकटकाळी त्यांनी मदत पाठवली. ते गोरगरिबांना सांभाळणारे नेते असल्याचे ते म्हणाले. या कुटुंबीयांच्या शासकीय कागदपत्रांची पूर्तता व मदतीसाठी जनसेवक अविनाश आव्हाड हे प्रयत्नशील राहणार असून या कुटुंबाला लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून यापुढेही मदत मिळवून देणार असल्याचे ते म्हणाले.

COMMENTS