पुणे : परदेशी हवामान संस्था असलेल्या स्कायमेटने यंदा 103 टक्के पाऊस कोसळण्याचा अंदाज व्यक्त केला असतांनाच भारतीय हवामान विभागाने मंगळवारी यंदा चा
पुणे : परदेशी हवामान संस्था असलेल्या स्कायमेटने यंदा 103 टक्के पाऊस कोसळण्याचा अंदाज व्यक्त केला असतांनाच भारतीय हवामान विभागाने मंगळवारी यंदा चांगला पाऊस कोसळणार असून, 105 टक्के सरासरी पाऊस कोसळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे यंदा पीक-पाणी उत्तम असणार असे दिसून येत आहे.
हवामान विभागाचे प्रमुख मृत्युंजय महापात्रा म्हणाले की, 2025 मध्ये 105 टक्के म्हणजेच 87 सेमी पाऊस पडू शकतो. 4 महिन्यांच्या मान्सून हंगामासाठी दीर्घ कालावधीची सरासरी 868.6 मिमी म्हणजेच 86.86 सेमी आहे. म्हणजेच पावसाळ्यात एकूण एवढा पाऊस पडायला हवा, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. सरासरी पावसाचा अंदाज बघितल्यास 1 जून रोजी केरळमध्ये मान्सूनचे आगमन होते. त्यानंतर सात ते आठ दिवसा मान्सून मुंबईच्या किनार्यावर धडकतो.
एप्रिल अणि जूनमध्ये उष्णतेच्या लाटा
हवामान विभागाचे प्रमुख मृत्युंजय महापात्रा यांनी यंदाच्या पावसावर भाष्य करतांनाच दुसरीकडे देशाच्या अनेक भागात तीव्र उष्णता असूनएप्रिल आणि जूनमध्ये उष्णतेच्या लाटेच्या दिवसांची संख्या वाढेल, असा अंदाज वर्तवला आहे. यामुळे पॉवर ग्रिडवर दबाव वाढेल आणि पाण्याची कमतरता निर्माण होईल. देशातील 52 टक्के कृषी क्षेत्र मान्सूनवर अवलंबून आहे.
मान्सूनवर अल निनोचा प्रभाव नाही
मागचे वर्ष सोडल्यास राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून दुष्काळाचा चांगलाच सामना करावा लागला आहे. मात्र मागच्या वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकरी आनंदात होता. यंदाही पाऊस चांगला असेल असा अंदाज स्कायमेटनंतर हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच यंदा यंदा मान्सूनवर अल निनोचा धोका नसल्याने देशात चांगला पाऊस पडणार आहे असे हवामान खात्याने सांगितले आहे. हा मान्सूनचा पहिला अंदाज असून पावसाळ्याच्या तोंडावर आणखी एक अंदाज व्यक्त केला जात आहे.
COMMENTS