Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

यंदा पावसासोबत चक्रीवादळाचा धोका अधिक

कर्जतमध्ये ग्रामदैवत संत गोदड महाराज यांच्या संवत्सरीतून वर्तविले भाकीत

कर्जत/प्रतिनिधी ः गेल्यावर्षी लागोपाठ आलेल्या चक्री वादळाच्या संकटातून बळीराजा आणि सरकारही सावरले नाही मात्र या वर्षी भरपूर पाऊस आणि चक्रीवादळाचा

प्रवरा नदी पात्रातून दोन मृतदेह सापडले ; मृतांची संख्या सहा
संगमनेरात जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा
वीजबिल वसूली उद्दीष्ट पूर्ण करा; अन्यथा कठोर कारवाई

कर्जत/प्रतिनिधी ः गेल्यावर्षी लागोपाठ आलेल्या चक्री वादळाच्या संकटातून बळीराजा आणि सरकारही सावरले नाही मात्र या वर्षी भरपूर पाऊस आणि चक्रीवादळाचा धोका होईल, तसेच काही प्रमाणात रोगराई संभवत असली तरी जनता सुखी व समाधानी राहील असे भाकित येथील ग्रामदैवत संत  गोदड महाराज यांच्या संवत्सरीतून वर्तविण्यात आले आहे.
      राज्याच्या ग्रामीण भागातील अनेक देवस्थांनांमध्ये अशा प्रकारे पुढील वर्षाचे भाकित वर्तविण्याची प्रथा आहे. ही भाकिते ऐकण्यासाठी लोकांमध्ये मोठी उत्सुकता असते. यातील अनेक भाकिते काही प्रमाणात खरी ठरल्याचा अनुभव येत असल्याचेही लोक सांगतात. कर्जत येथील संत सद्गुरु गोदड महाराज यांनी साठ वर्षांची संवत्सरी लिहून ठेवली आहे. दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी त्यातील आगामी वर्षाचे पान उघडून त्याचे वाचन करण्यात येते.  भाकित ऐकण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. गोदड महाराज मंदिराचे  पुजारी पंढरीनाथ महाराज काकडे यांनी या संवत्सरीचे वाचन केले. त्यामध्ये म्हटले आहे की, यावर्षी वादळी पावसामुळे राजा व प्रजा दोघेही त्रस्त होतील. आगामी वर्षामध्ये सर्वत्र चक्रीवादळ व वादळी वार्‍यासह पाऊस पडून मोठ्या प्रमाणात नुकसान होईल. याचा त्रास राजा व प्रजा या दोघांना होणार आहे. मात्र, यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस पडणार आहे. पिकेही चांगली येणार आहेत. मात्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण आणि भाद्रपद या महिन्यांमध्ये सर्वत्र मोठ्या प्रमाणामध्ये वादळ, वारा, पाऊस होऊन नुकसान संभवते. सागराच्या किनारपट्टीवर सर्वत्र धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मान्सून वेळेपूर्वी भारतात दाखल होईल. खरीप हंगामात हंगामात पिके चांगली येतील. मूग, ऊस, गहू, भात ही पिके मुबलक येणार आहेत, असे भाकित करण्यात आले मंदिराचे प्रमुख मानकरी असलेले मेघनाथ पाटील यांनी नागेश्‍वर मंदिराच्या ठिकाणी पाऊस व धान्याचे टाकलेले आढे काढून नंतर सवाद्य मिरवणुकीने त्यांना गोदड महाराज मंदिरापाशी आणण्यात आले. त्यानंतर वाचन सुरू झाले.

COMMENTS