मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात मे महिन्यात उष्णतेची लाट असून, उष्माघातामुळे आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला असून, अनेकांना आता मान्सून महाराष्ट्रात कधी
मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात मे महिन्यात उष्णतेची लाट असून, उष्माघातामुळे आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला असून, अनेकांना आता मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार याची उत्सुकता लागली आहे. मात्र यंदा मान्सून महाराष्ट्रात 7 जूनच्या आसपास दाखल होण्याचा अंदाज स्कायमेट या हवामान संस्थेने वर्तवला आहे.
यंदा मान्सूनची सुरूवात कमकुवत असल्यामुळे पावऊस देखील कमी आणि अनियमित पडण्याचा अंदाज यापूर्वीच विविध हवामान संस्थांनी वर्तवला आहे. अंदमानमध्ये मान्सून उशिराने दाखल होणार असल्याचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. यंदा मान्सूनची सुरुवात कमकुवत दिसत असल्याने विलंबाने मान्सून दाखल होणार असल्याचे सांगितले जात आहे. संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्था मान्सूनवर अवलंबून असते. 22 मे रोजी दरवर्षी मान्सून देशात दाखल होतो आणि 1 जून रोजी केरळमध्ये येतो. परंतु यावर्षीची परिस्थिती वेगळी आहे. चक्रीवादळ आणि बदललेल्या परिस्थितीमुळे 22 मेची तारीख हुकणार आहे. केरळमध्ये नेमका कधी येणार, याबद्दल निश्चितता नाही. मागच्या वर्षी 1 जूनच्या ऐवजी 3 जून रोजी केरळमध्ये मान्सून दाखल झाला होता. यावर्षी 11 जून रोजी मान्सून मुंबईत दाखल होणार होईल तर 7 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून येईल, असे स्कायमेटने सांगितले आहे. तज्ज्ञांच्या मते यंदा मान्सूनची गती धिमी आहे. त्यामुळे शेतकर्यांना योग्य सल्ला घेऊनच पीकपेर्याचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आलेले आहे.
दरम्यान, भारतीय हवामान विभागाने मुंबईत यंदा 10 किंवा 11 जूनला मान्सूनचे आगमन होईल, अशी शक्यता वर्तवली आहे. तर, स्कायमेटनेही याबाबतचा अंदाज जाहीर केला आहे. स्कायमेटनूसार, तळकोकणात 7 जूनला मान्सूनचे आगमन होईल. तर, मुंबईत 11 जूनला मान्सूनचे आगमन होईल. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भारतीय हवामान विभागाचा नवा अंदाज येणार आहे. त्यावेळी अल निनोच्या परिणामासंदर्भात अधिक माहिती दिली जाणार आहे. यंदा अल निनो असणार, परंतु त्याचा मोठा प्रभाव नसेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. भारतात जुलै महिन्यात अल निनो सक्रिय होत आहे. आतापर्यंत 15 वेळा अल निनो सक्रीय असताना मान्सून 6 वेळा अतिवृष्टी देऊन गेला आहे.
पाऊस जूनच्या पहिल्या आठवड्यात- स्कायमेट या संस्थेपाठोपाठ भारतीय हवामान विभागाने देखील यंदा जूनच्या पहिल्याच आठवड्यात भारतात मान्सूनचे आगमन होईल, अशी शक्यता वर्तवली आहे. तसेच, यावर्षी सरासरी 96 टक्के पाऊस होणार असल्याचा अंदाजही व्यक्त केला आहे. मुंबई आणि प्रादेशिक हवामान केंद्राचे प्रमुख सुनील कांबळे यांनी माध्यमांना मान्सूनबाबत ही माहिती दिली. ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनीही जून महिन्यात मान्सून भारतात वेळेवर किंवा वेळेआधी दाखल होण्याची शक्यता वर्तवली आहे.
COMMENTS