हा फक्त ट्रेलर पिक्चर अजून बाकी ; आशिष शेलारांच्या वक्तव्याने पुन्हा ट्विस्ट

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हा फक्त ट्रेलर पिक्चर अजून बाकी ; आशिष शेलारांच्या वक्तव्याने पुन्हा ट्विस्ट

मुंबई : राज्यातील सत्तानाटय संपुष्टात आले असले तरी, अनेपेक्षितपणे एकनाथ शिंदे यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी घोषणा खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी केल

‘यशस्वीतेचा सुवर्णमंत्र’ या पुस्तकातून तरुण पिढीने प्रेरणा घ्यावी :- अभिनेते राहुल सोलापूरकर
संतापलेल्या बैलाचा तरुणावर हल्ला
अतिथी देवो भव : अजित पवारांचा राखीव सूटमध्ये अमित शाहांचा मुक्काम

मुंबई : राज्यातील सत्तानाटय संपुष्टात आले असले तरी, अनेपेक्षितपणे एकनाथ शिंदे यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी घोषणा खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर भाजपने पुन्हा एकदा धक्कातंत्राचा परिचय दिला. पण त्यानंतर पुन्हा एकदा ऐनवेळी देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद देऊन त्यांचे अवमूल्यन कशासाठी केले, असा सवाल राज्यातून विचारला जात होता. मात्र हा फक्त ट्रेलर असून, पिक्चर अजून बाकी असल्याचे विधान करून, आशिष शेलार यांनी रंगत आणली आहे.
2014 साली सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी पद मागितले नव्हते असेही आशिष शेलार यांनी सांगितले आहे. एवढेच नाही तर, हा फक्त ट्रेलर आहे, अजून देवेंद्र फडणीस यांचा अजून मोठा चित्रपट येणार आहे असेही आशिष शेलार यांनी म्हटले आहे. दरम्यान शेलार यांच्या विधानाने नेमका फडणवीस यांचा चित्रपट कसा असेल? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 2014 साली जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले होते, त्यावेळी सुद्धा त्यांनी पद मागितले नव्हते. अन्य पक्षामध्ये जशी रस्सीखेच तसेच लॉबिंग देवेंद्र फडणवीस यांनी कधीच केली नाही. त्या काळात सुद्धा पक्षातील अन्य नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम केलं आहे. भाजपची ही प्रथा आणि परांपरा राहिली आहे. मला असे वाटते हा ट्रेलर आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा बिंग पिक्चर मोठा पिक्चर अजून येणे बाकी आहे. देवेंद्र फडणवीस यांचा मेगा शो आपण येणार्‍या काळामध्ये बघाल. असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे. यावर बोलताना शेलार म्हणाले की, मला सांगा देशातील कुठल्या मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्याला पदावर विराजमान होण्यासाठी एवढ्या मोठ्या नेत्यांनी सार्वजनिक निवेदन केले. देवेंद्रजींच्या बाबतीत केलेले निवेदन हा गैरसमजाचा भाग नसून अभिमानाचा भाग आहे. मला असे वाटते की येणारा काळात देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व अजून मोठे झालेले आपल्याला दिसेल. असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

COMMENTS