व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 198 रुपयांची कपात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 198 रुपयांची कपात

नवी दिल्ली : वाढत्या महागाईच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे. एलपीजी गॅसच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. इंडियन ऑइलने जाहीर केल

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात मोडी लिपी कार्यशाळा संपन्न
चाळीसगावच्या दिंडीत…रंगला रिंगण सोहळा
BREAKING: आनंदऋषी हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या जीवाशी खेळ | LokNews24

नवी दिल्ली : वाढत्या महागाईच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे. एलपीजी गॅसच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. इंडियन ऑइलने जाहीर केलेल्या किंमतीनुसार दिल्लीत 19 किलोंच्या एलपीजी सिलेंडरमध्ये 198 रुपयांची घट झाली आहे.
इंडियान ऑईलने एलपीजी सिलेंडरचे दर 198 रुपयांनी कमी केले आहेत. कंपनीने शुक्रवारी 1 जुलै रोजी जाहीर केलेल्या किमतींनुसार, राजधानी दिल्लीत 19 किलोचा व्यावसायिक सिलेंडर 198 रुपयांनी स्वस्त झाला आहे. जनतेला महागाईपासून दिलासा देण्यासाठी सरकारने उज्ज्वला योजनेंतर्गत प्रति सिलेंडर 200 रुपये सबसिडी जाहीर केली होती. ही सबसिडी वर्षाला फक्त 12 सिलिंडरपर्यंत उपलब्ध असेल. सरकारच्या या निर्णयाचा 9 कोटींहून अधिक ग्राहकांना फायदा झाला आहे. यापूर्वी 1 जून रोजी व्यावसायिक एलपीजी सिलिंडर 135 रुपयांनी स्वस्त झाले होते. अशाप्रकारे गेल्या महिनाभरात सिलिंडरच्या दरात 300 रुपयांहून अधिक कपात झाली आहे. मे महिन्यात सिलिंडरचे दर 2354 रुपयांपर्यंत वाढले होते. घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत अखेरचा बदल 19 मे रोजी करण्यात आला होता. दिल्लीत 30 जूनपर्यंत 19 किलोचा व्यावसायिक सिलेंडर 2219 रुपयांना मिळत होता. ज्याची किंमत 1 जुलैपासून 2021 रुपयांपर्यंत खाली आली आहे. त्याचप्रमाणे कोलकातामध्ये 2322 रुपयांच्या तुलनेत आता हा सिलिंडर 2140 रुपयांना मिळणार आहे. मुंबईत 2171.50 रुपयांवरून 1981 रुपयांवर, तर चेन्नईमध्ये 2373 रुपयांवरून 2186 रुपयांपर्यंत किंमत कमी झाली आहे. दरम्यान घरगुती गॅस सिलिंडरमध्ये तेल कंपन्यांकडून कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. दिल्लीत 14.2 किलोचा गॅस सिलिंडर 1003 रुपयांना मिळत आहे.

COMMENTS