Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जावळी तालुक्यात चोरट्यांकडून 21 बंद घरे लक्ष्य : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

मेढा / प्रतिनिधी : जावळी तालुक्यात करंजे, सावली, आसणी, भोगवली, पुनवडी, केडंबे, वाळंजवाडी आणि वरोशी या गावातील 21 बंद घराच्या घरफोडी केल्याची घटना

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून 5 कोटींचा निधी मंजूर
इस्लामपूरातील प्रभाग 11 मध्ये काट्याच्या लढती…?
सातारा जिल्हा बँकेकडून कर्जे स्वस्त केल्याची घोषणा

मेढा / प्रतिनिधी : जावळी तालुक्यात करंजे, सावली, आसणी, भोगवली, पुनवडी, केडंबे, वाळंजवाडी आणि वरोशी या गावातील 21 बंद घराच्या घरफोडी केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. यामध्ये रोख रकमेसह साहित्य चोरीला गेले आहे. या प्रकारामुळे जावळी तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मेढा पोलिसांना याची माहिती मिळताच सपोनि अमोल माने यांनी घटनास्थळी भेटी देवून तपास गतिमान केला. यावेळी श्‍वान पथकाही पाचारण करण्यात आले होते.
घरफोडीत चोरांनी करंजे सावली, आसणी भोगवली, पुनवडी, केडंबे, वाळंजवाडी व वरोशी या गावातील बंद घरांना लक्ष करून एक रात्रीत ही घरे चोरट्यांनी फोडली आहेत. यामध्ये कोणाचे किती नुकसान झाले आहे हे नेमके समजू शकले नाही. दरम्यान, चोरांबे गावात चोरीचा हा सर्व प्रकार होत असताना चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. याबाबत मेढा पोलीस स्थानकात अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सपोनि अमोल माने यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जाधव अधिक तपास करत आहेत. जावळीत बंद घरांची घरफोडी घडण्याचा प्रकार अनेक वेळा घडला असला तरी एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर घरफोड्या होण्याची ही मोठी घटना आहे. यामुळे पोलीस प्रशासनाने सतर्क राहण्याची गरज आहे. तालुक्यातील अनेक गावात सीसीटीव्ही यंत्रणा नसल्यामुळे अशा चोर्‍याचे प्रमाणात वाढ होत आहे. गावात सीसीटीव्ही असतील तर या घरफोड्या थांबतील. या घरफोडीत कोणताही अनुचित प्रकार घडला नसला तरी चोरट्यांनी बंद घरांना लक्ष केले असून याकरीता अत्याधुनिक साहित्याचा वापर केल्याचा अंदाज आहे.

COMMENTS