Homeताज्या बातम्याशहरं

अधीक्षक अभियंता छाया नाईक यांच्यासह या अधिकाऱ्यांचा कोट्यावधीचा भ्रष्टाचार

https://www.youtube.com/watch?v=50UYfsWAvPs अधीक्षक अभियंता छाया नाईक यांचा भ्रष्टाचाराचा विक्रमसा.बां.रत्नागिरी मंडळात असतांना केला कोट्यावधीं

राज्याला कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका कमी : आरोग्यमंत्री टोपे
अदानी प्रकरणी सरकार गप्प का ?
 ‘रोहित शेट्टी’च्या सर्कस चित्रपटाचे टीझर रिलीज

अधीक्षक अभियंता छाया नाईक यांचा भ्रष्टाचाराचा विक्रम
सा.बां.रत्नागिरी मंडळात असतांना केला कोट्यावधींचा गैरव्यवहार
मुंबई ः सार्वजनिक बांधकाम विभाग रत्नागिरी मंडळाच्या तत्कालीन अधीक्षक अभियंता श्रीमती छाया नाईक यांनी या विभागात कोट्यावधींचा गैरव्यवहार विविध अधिकार्‍यांच्या संगनमताने केल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण प्रकरणात नेमका त्यांच्यावर कुणाचा कृपाशिर्वाद होता, याची चर्चा होत आहे.

तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण कार्यरत असतांना हा भ्रष्टाचार झाला आहे. श्रीमती छाया नाईक यांनी अधीक्षक अभियंता असतांना तीन वर्षांमध्ये अनियमित कामे केली. नियमबाह्य कामांचा धडाका लावत त्यांनी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला. त्यासंदर्भातील तक्रारी राज्य सरकारकडे, जीएसटी कार्यालयाकडे आणि आयकर विभागाकडे, तसेच लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे प्रलंबित आहेत. या संपूर्ण तक्रारीची दखल घेऊन राज्य सरकारने गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल करून चौकशी करण्याची गरज होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे श्रीमती छाया नाईक यांना नेमका कुणाचा कृपाशिर्वाद आहे, अशी चर्चा जोर धरतांना दिसून येत आहे. राज्य कर उपायुक्त वस्तू व सेवा विभाग रत्नागिरी, यांच्याकडे देखील यासंदर्भात तक्रार केली आहे. या तक्रारीत तत्कालीन अधीक्षक अभियंता श्रीमती छाया नाईक, विद्यमान अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी तिथे आहेत. यासोबतच कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर, लेखापाल अनिलकुमार शर्मा, उपअभियंता, सा.बां. उपविभाग क्रमांक 1 रत्नागिरी जनक हरीदास धोत्रेकर, उपअभियंता प्रमोद विठ्ठल भारती, उपअभियंता पूजा राजेंद्र इंगवले, कनिष्ठ अभियंता अ.बी. पवळ या अधिकार्‍यांविरोधात ही तक्रार दाखल असून, या तक्रारीत संबंधित पुरावे देखील दिले आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होऊन दोषी अधिकार्‍यांविरोधात कठोर कारवाई करण्याची गरज आहे.

COMMENTS