पुणे/प्रतिनिधी ः राज्यात ठाकरे गट आणि शिंदे गटातील वाद विकोपाला गेला असून, ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्

पुणे/प्रतिनिधी ः राज्यात ठाकरे गट आणि शिंदे गटातील वाद विकोपाला गेला असून, ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका केल्यानंतर पुण्याचे पालकमंत्री यांनी केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले की, हिंदुत्वाचे मोठे नुकसान करत आहेत. त्यामुळे सर्वकाही थांबले पाहिजे. त्यात मी असा विचार व्यक्त करणे की, शिवसेना उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र येणे, त्याची चर्चा होईल. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर महाराष्ट्रात मोठी उलथापालथ होईल, असही पाटील म्हणाले.
दरम्यान अनेकजण काठावर आहेत. ते सर्वजन कोर्टाचा निकाल लागण्याची प्रतीक्षा करत आहेत, असा दावाही पाटील यांनी केला आहे. शिंदे गटाचा लोकांना मोदींचा आशीर्वाद आणि फायदा होणार आहेच. पण महाराष्ट्रातील परिस्थिती कधी नव्हे इतकी झाली आहे. सतत बदलणारी. त्यामुळे आता जागावाटप ठरवता येणार नाही. आता शिरूरच काय करायचं कसं ठरवणार. समजा उदाहरण म्हणून कोल्हेना वाटले की आपण भाजप मध्ये जावे तर त्यांनी शिंदे का भाजप कडून कोणाकडून लढायचे ते ठरवावे लागेल. लोकसभा डिसेंबर-जानेवारी आणि विधानसभा लोकसभेनंतर सुरू होईल, असेही पाटील यांनी नमूद केले.
COMMENTS