मुक्या प्राण्यांसाठी नगरमध्ये होणार 100 पाणवठे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुक्या प्राण्यांसाठी नगरमध्ये होणार 100 पाणवठे

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर शहरातील रस्त्यांवर फिरणारी कुत्रे, मांजरे, गायी, शेळ्या-मेंढ्या व अन्य मुक्या प्राण्यांना प्यायला पाणी मिळण्यासाठी येथील वाघ्

जागतिक शांतता व सलोखा साठी महात्मा गांधींचे विचार प्रेरणादायी – सॅम पित्रोदा
1 मेपासून 18 वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीस एक लस दिली जाणार आहे | पहा सकाळच्या बातम्या | Lok News24
राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रवरा स्कूलचे यश

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर शहरातील रस्त्यांवर फिरणारी कुत्रे, मांजरे, गायी, शेळ्या-मेंढ्या व अन्य मुक्या प्राण्यांना प्यायला पाणी मिळण्यासाठी येथील वाघ्या फाउंडेशनद्वारे 100 ठिकाणी पाणवठे केले जाणार आहे. शहराच्या विविध भागात 100 सिमेंटचे छोटेखानी पाणवठे केले जाणार असून, परिसरातील नागरिकांच्या मदतीने त्यात नियमितपणे पाणी भरले जाणार आहे. याचाच भाग म्हणून सावेडीतील पाईपलाईन रोड येथील एकवीरा चौकातील हॅपी होम्स फर्निचर समोर या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी वाघ्या फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा, राधीका रणभोर, उषा सोनवणे, सागर ठोके, अमोल कनगरे, सारिका कांगला, राहुल वर्मा, निखील बुरा उपस्थित होते. मागील 2 वर्षा पासून प्राण्यांसाठी वाघ्या फाउंडेशन ही संस्था कार्यरत असून, भटक्या प्राण्यांना जेवण, त्यांच्यावर औषधोपचार तसेच गरजेनुसार शस्त्रक्रिया आदी कार्य फाउंडेशनच्या माध्यमातून केले जाते. सध्या उन्हाचा तडाखा वाढला असून माणसालाच उष्णतेची दाहकता सहन होत नाही. त्यामुळे मुक्या प्राण्यांचीही काळजी घेताना त्यांना स्वच्छ पाणी प्यायला मिळण्यासाठी शहरात 100 सिमेंटचे पाणवठे केले जाणार असल्याचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी सांगितले. यावेळी बोलताना राधिका रणभोर म्हणाल्या की, वाघ्या फाउंडेशनच्या माध्यमातून मुक्या जनावरांची तहान भागवण्यासाठी नागरिकांना मोफत सिमेंटचे पाणवठे दिले जाणार आहे. जे नागरिक या भांड्यांची योग्य निगा राखतील, त्या नागरिकांना हे भांडे उपलब्ध करून दिले जाणार आहे. मुक्या जनावरांची तहान भागवणे हा उपक्रम फाउंडेशनने हाती घेतला असून शहरात ठिकठिकाणी हा उपक्रम राबविला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्राणी मित्रांनी या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाघ्या फाउंडेशनसमवेत काम करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

COMMENTS