नवी दिल्ली : संसद हे लोकशाहीचे मंदिर असून त्याचे पावित्र्य कायम ठेवण्यासाठी त्याठिकाणी चिखलफेक नव्हे तर दर्जेदार आणि साधक-बाधक चर्चा झाली पाहिजे असे
नवी दिल्ली : संसद हे लोकशाहीचे मंदिर असून त्याचे पावित्र्य कायम ठेवण्यासाठी त्याठिकाणी चिखलफेक नव्हे तर दर्जेदार आणि साधक-बाधक चर्चा झाली पाहिजे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. हिमाचल प्रदेशातील शिमला येथे आयोजित पीठासीन अधिकार्यांच्या 82 व्या अखिल भारतीय परिषदेला व्हर्युअली संबोधित करताना ते बोलत होते.
याप्रसंगी पंतप्रधानांनी पीठासीन अधिकार्यांची संविधान, सभा आणि जनतेसाठी असेलली जबाबदारी यावर संवाद साधला. सदनात वाद-विवाद व्हावे त्यात राजकीय चिखलफेक नको. सदनात दर्जेदार संवादावर भर द्यायला हवा. आपल्या संसदेची परंपरा आणि व्यवस्था ही भारतीय हवी. आपली रणनिती, कायदा हा भारतीयत्व, एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पाला बळ देणारा असावा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे संसदेत आपला स्वत:चा वावर हा भारतीय मूल्यांप्रमाणे असावा ही आपली जबाबदारी असल्याचे मोदींनी सांगितले. आपला देश हा विविधतेने संपन्न असा आहे. हजारो वर्षांच्या विकासाच्या प्रवासात आपण विविधतेत एकता आणि अखंडता कायम ठेवली आहे. हीच एकता आपल्या विविधतेला आणखी मोठे करते, तसेच संरक्षण करते. सदनामध्ये वर्षातून 4 ते 5 दिवस असे ठेवता येतील का जे समाजासाठी काही विशेष करणार्या लोकप्रतिनिधींना त्यांचा अनुभव सांगता येईल असा प्रस्तावह त्यांनी ठेवला. गेल्या काही वर्षात देशाने एक वेगळी उंची गाठली असून अनेक असामान्य गोष्टी साध्य केल्या आहेत. सामूहिक प्रयत्नामुळे हे शक्य होऊ शकले. लोकशाहीत जेव्हा आपण प्रत्येकाच्या प्रयत्नाबद्दल बोलतो, भारताच्या व्यवस्थेबद्दल बोलतो तेव्हा सर्व राज्यांची भूमिका महत्त्वाची ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. लोकप्रतिनिधींसह समाजातील इतर लोकांनाही भरपूर शिकायला मिळेल. आपण दर्जेदार डिबेटसाठी वेगळी वेळ निश्चित करण्याबाबत विचार करू शकतो का? अशा वादविवादामध्ये मर्यादेचे, गांभीर्याचे पूर्णपणे पालन व्हावे, कोणतीही राजकीय चिखलफेक करू नये. एकप्रकारे संसदेतील तो निकोप काळ असावा. आरोग्यदायी दिवस असावा असेही मोदी म्हणालेत. नव्या सदस्यांना संसदेशी संबधित व्यवस्थेचं प्रशिक्षण देण्यात यावं. संसदेच्या पावित्र्याची आणि मर्यादेची माहिती त्यांना सांगण्यात यावी. आपण सतत संवादावर भर द्यायला हवा. राजकारणाचे नवे आदर्श तयार करायला हवेत. यात तुम्हा सर्व भारतीय पीठासीन अधिकार्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
COMMENTS