Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दुसर्‍यांच्या वेदना वाटून घेण्याइतके दुसरे पुण्य नाही

गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी : टेके पाटील ट्रस्टच्यावतीने कपडे, मिठाई वाटप

कोपरगाव प्रतिनिधी  : ज्यांच्या घरी पैसा आहे, संपती आहे त्यांच्यासाठी दिवाळी हि सुखाची तारांबळ आहे याउलट ज्यांची परिस्थिती बेताची आहे. त्यांची ऐपत

राज्यात अतिवृष्टीचे 84 बळी
पालकत्व स्वीकारण्यास असमर्थता दाखवल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल
*दैनिक लोकमंथन ; कोरोनानंतरच्या लसीकरणावर केंद्राच्या निर्णयाला तज्ज्ञांचा आक्षेप

कोपरगाव प्रतिनिधी  : ज्यांच्या घरी पैसा आहे, संपती आहे त्यांच्यासाठी दिवाळी हि सुखाची तारांबळ आहे याउलट ज्यांची परिस्थिती बेताची आहे. त्यांची ऐपत नाही त्यांच्यासाठी दिवाळी म्हणजे तारांबळीतील सुख असते. अशाच प्रकारे ज्या लोकांच्या वाट्याला दु:ख, दारिद्रय आले आहे. त्यांच्या वेदना वाटून घेता आली पाहिजे. सुखात अनेक वाटेकरी असतात दुखात कोणी वाटेकरी होत नाही. वेदना वाटून घेण्याइतके पुण्य दुसरे कोणतेच नाही याच भावनेतून गेली तीन वर्ष टेके पाटील ट्रस्ट कार्य करत आहे हे निश्‍चितच कौतुकास्पस्द आहे, अशा भावना कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तथा प्रशासक सचिन सूर्यवंशी यांनी व्यक्त केल्या.

      कोपरगाव तालुक्यातील वारी येथील राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्टने सामाजिक बांधिलकीतून गावातील सर्वच वयोगटातील सुमारे 60 गरजवंत लाभार्थ्यांना दिवाळीनिमित्त कपडे, मिठाई वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोदावरी दुध संघाचे माजी संचालक उत्तमराव माने होते. या कार्यक्रमात दिवाळीनिमित्त मिळालेल्या या मदतरूपी भेटीमुळे लहानग्यापासून, वयोवृद्ध आजी-आजोबा, माता भगिनीच्या चेहर्‍यावरील आनंद समाधान देणारा होता. या कार्यक्रमासाठी कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, सहायक गटविकास अधिकारी बाळासाहेब साबळे, माजी सरपंच सतीश कानडे, माजी ग्रामपंचायत सदस्य मधुकर टेके, सुवर्णा गजभिव, वारीचे वैधकीय अधिकारी डॉ. अनिकेत खोत, प्रतिष्ठीत व्यापारी नरेंद्र ललवाणी, मदन कबरा, मधुकर टेके, संजय कवडे,  विजय निळे, मच्छिंद्र मुरार, भीमराव आहेर, हुसेन शेख, बापू पवार, अशोक निळे, सुधाकर वाघ, मनोज जगधने, ग्रामपंचायत सदस्य योगेश झाल्टे, प्रणाली देशमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन रोहित टेके यांनी केले. या कार्यक्रमासाठी सर्व मित्र परिवार, ग्रामस्थ, प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्वच अधिकारी, कर्मचारी, लाभार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी गोरख टेके यांनी आभार मानले.

COMMENTS