Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

न्यायालयात जाण्याचे कोणतेही कारण नाही ः जयंत पाटील

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँगे्रस नेमकी कुणाची असा सवाल उपस्थित होत आहे. अजित पवार यांनी बंड करत राष्ट्रवादी

Ahmednagar : सीना नदीचे होणार सुशोभिकरन…मंत्री जयंत पाटलांनी केली पाहणी
बेकायदेशीरपणे एसटी बस चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा.
जयंत पाटलांची सत्ता गेली आहे , पण माज अजून गेला नाही

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँगे्रस नेमकी कुणाची असा सवाल उपस्थित होत आहे. अजित पवार यांनी बंड करत राष्ट्रवादी काँगे्रस पक्ष आणि पक्षचिन्ह घडयाळावर दावा ठोकला आहे. त्यामुळे आगामी लढाई न्यायालयात होईल अशी अपेक्षा होती, मात्र यासंदर्भातील दावा प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी फेटाळून लावत न्यायालयात जाण्याचे कोणतेही कारण नसल्याचे म्हटले आहे.
याबाबत माध्यमांशी बोलतांना जयंत पाटील म्हणाले की, आम्हाला कोर्टात जाण्याचे काही कारण नाही, आमचा पक्ष व्यवस्थित चाललाय अशी प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील म्हणाले, चंद्रचूड साहेबांचा निकाल वाचा. पक्षाचे निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला आहे हे आपल्या लक्षात येईल. शरद पवार जोपर्यंत मला बाजूला व्हायला सांगत नाही तोपर्यंत मला बाजूला जाण्याचा अधिकार नाही असे जंयत पाटील म्हणाले. बंडखोरांवर कायदेशीर कारवाई करणार का? असा प्रश्‍न विचारला तेव्हा जंयत पाटील म्हणाले, कोर्टात जाण्याचे काही कारण नाही. आमचा पक्ष व्यवस्थित चालला आहे. महाराष्ट्राची जनता आमच्या बाजूने असल्याने कोर्टात जाण्याचा प्रश्‍न नाही, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. जयंत पाटील म्हणाले, 53 पैकी नऊ आमदारांवर आम्ही कारवाई केली आहे. उरलेले जितके आमदार आहेत ते सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. ते आमच्या बरोबर आहेत. त्यांना आता वेगवेगळ्या लोकांनी संकटात आणू नये, प्रलोभन दाखवू नये आणि दबाव आणू नये, असेही जंयत पाटील म्हणाले. जयंत पाटील यांनी सांगितले की, बहुतेक सर्व आमदार आहेत, त्यांना परत येण्याची इच्छा आहे. काही लोक तसेच रहावे अशा भूमिकेत आम्हाला दिसत आहेत. महाराष्ट्राचे कार्यकर्ते आणि आमदार उद्या एक वाजता बैठकीला एकत्र दिसतील असा मला विश्‍वास आहे असेही ते म्हणाले. जयंत पाटील म्हणाले, महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्ते हे शरद पवार यांच्या मार्गदर्शनासाठी आज मुंबईत येत आहेत. पवार साहेबांना किती पाठिंबा आहे ते उद्या आपल्याला यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये कळेल. आमची नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी आहे, अलीकडे जी झाली ती नोशनल पार्टी आहे, त्या पार्टीने मला निलंबित केले काय आणि ठेवले काय, मी शरद पवार यांच्या पार्टीचा अध्यक्ष आहे. त्यामुळे अशा कोणत्याही पार्टीच्या निर्णयाबद्दल मला काही फरक पडत नाही, असे देखील जयंत पाटील म्हणाले आहेत.

COMMENTS