Homeताज्या बातम्याविशेष लेख

ममते शिवाय समता नाही

आपल्याला आठवते तेव्हापासून आपण नेहमी म्हणतो। आपण भारताचे नागरिक आहोत व सगळे बांधव आहोत . शालेय जीवनापासून अनेक एक वेळा अशी प्रार्थना आपण म्हणतच अ

दसरा मेळाव्यात कोल्हे कुई… करतात ते ऐकायला जाऊ नका !
 विनयभंगप्रकरणी आरोपीला एक वर्षाची शिक्षा 
संजीवनीच्या दोन खेळाडूंची महाराष्ट्र  संघात निवड

आपल्याला आठवते तेव्हापासून आपण नेहमी म्हणतो। आपण भारताचे नागरिक आहोत व सगळे बांधव आहोत . शालेय जीवनापासून अनेक एक वेळा अशी प्रार्थना आपण म्हणतच असतो. परंतु नीट विचार केला तर ह्या प्रतिज्ञेप्रमाणे  आपण नेहमी वागतो का? भारत हा विशाल खंडप्राय देश आहे आपल्या देशामध्ये अनेक जाती धर्म आणि पंथांचे लोक हजारो वर्षांपासून एकत्रितपणे गुण्यागोविंद्याने राहत आहेत।

सर्वधर्मीय समानत्व हा भारतीय जन समाजाचा वैचारिक पाया आहे. बर्‍याच वेळा मात्र हा भक्कम पाया आता झाला आहे असे वाटू लागते .काही प्रसंग मनाला चटका लावून जातात.। पूर्वीच्या काळी एकत्रितपणे वागणारा जन समाज जगण्यामध्ये सुसूत्रता आणि व्यवस्थितपणा निर्माण व्हावा यासाठी कामांची विभागणी करण्यात आ लाकडाचे काम करणारे सुतार लोखंडाचे काम करणारे लोहार सोन्यासारखे धातु घडवणारे सोनार शेती करणारे शेतकरी अशाप्रकारे अनेक वर्ग निर्माण झाले.पुढे जाऊन तर हे व्यवसाय फक्त व्यवसाय उरले नाही तर त्यांचे जाती मध्ये रूपांतर झाले। लोहार ,सुतार, चांभार, सोनार ,शिंपी, कुंभार , माळी, वाणी इत्यादी यासारखे फक्त व्यवसाय उरले नाही तर या जातीच बनून गेल्या.   मग सुरु झाले मी तू पणा चे चक्र. आम्ही श्रेष्ठ की तुम्ही श्रेष्ठ या वादा मधून अनेक समस्या निर्माण होऊ लागल्या.

       माणसाने फक्त जगण्यामध्ये सुसूत्रता यावी आणि आयुष्य सुखकर व्हावे यासाठी एक सोय म्हणून कामांची व्यवस्थित विभागणी केली. जसे लोकांची आर्थिक परिस्थिती बदलू लागली तसेच त्यांचा या व्यवसायिकांकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलू लागला. तसे पाहता सगळी कामे श्रेष्ठच असतात. कोणतेही काम कमी दर्जाचे किंवा कनिष्ठ नसते. हलक्या प्रतीचे काम करणारे माणसे कमी महत्त्वाची आणि कनिष्ठ आहेत असा एक समज निर्माण झालेला दिसतो. फक्त जात किंवा वंश पंथ आणि धर्म यावरूनच समाजात विषमता केली जाते असे नाही तर आर्थिक परिस्थितीवरून देखील विषमता निर्माण केली जाते. श्रीमंत लोक गरिबांना तुच्छतेने बघतात. त्यांना स्वतः पेक्षा कमी समजतात. मालक नोकरांना तुच्छतेने वागवतात . वेळोवेळी त्यांचा अपमान करतात.

स्त्रियांना देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये अपमान सहन करावा लागतो. बऱ्याच ठिकाणी स्त्रियांना कमी महत्त्व दिले गेलेले दिसते. तसे पाहता स्त्रिया पुरुषांपेक्षा कोणत्याच बाबतीत कमी नाही , उलट त्या पुरुषांपेक्षा काकणभर सरसच असतात. अशी विषमता देखील सामाजिक विषमता म्हणावी लागेल. आता सर्वात महत्त्वाचे मला असेच म्हणावेसे वाटते की विषमता कोणत्याही प्रकारची असू द्या. जोपर्यंत सर्वांविषयी मनामध्ये प्रेम, करुणा ,माया ,ममता निर्माण होत नाही तोपर्यंत समता देखील निर्माण होऊ शकणार नाही. सर्व समान आहेत कोणीही  तुच्छ किंवा उच्च नाही. सर्वजण एकाच निसर्गाचा भाग आहेत व एकाच परमेश्वराची निर्मिती आहेत अशी ममत्वाची भावना निर्माण झाली की समता आपोआपच निर्माण होईल.

योगेश रोकडे नाशिक – ९४२२८९२१९८

COMMENTS