Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमदारांच्या अपात्रतेवर दिरंगाई नाही

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे वक्तव्य

मुंबर्ई/प्रतिनिधी ः राज्यात सत्तांतर होऊन एक वर्षांपेक्षाही अधिक काळ उलटला असून, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येवून बरेच महिने उलटले असले तरी, आमद

 विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार
‘त्या’ 16 आमदारांचा पात्र-अपात्रतेचा फैसला लवकरच
राहुल नार्वेकर विधानसभेचे सर्वात तरूण अध्यक्ष

मुंबर्ई/प्रतिनिधी ः राज्यात सत्तांतर होऊन एक वर्षांपेक्षाही अधिक काळ उलटला असून, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येवून बरेच महिने उलटले असले तरी, आमदारांच्या पात्र-अपात्रतेवर अजूनही कोणताही फैसला घेण्यात आलेला नाही, त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर याप्रकरणी कधी निमर्णय घेणार असा सवाल विचारला जात असतांना, नार्वेकर यांनी आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्यात कोणतीही दिरगांई होणार नसल्याचे बुधवारी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
विधानसभा अध्यक्षांनी आमदारांच्या पात्र-अपात्रतेचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा यासाठी ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र शिवसेनेच्या आमदारांनी आपले म्हणणे सादर करण्यासाठी वेळ मागितल्यामुळे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आणि ठाकरे गटाच्या प्रत्येक आमदारांची स्वतंंत्र सुनावणी घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे यासंदर्भातील निर्णय लांबणीवर पडणार असल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात नार्वेकर म्हणाले, आमदारांच्या अपात्रता प्रकरणात उचित कारवाई सुरू आहे. ज्यावेळी विधानसभा अध्यक्ष अपात्रतेच्या याचिकेवर निर्णय घेत असतात त्यावेळी ते ‘क्वाजय ज्युडिशियल ऑथेरिटी’ म्हणून काम करत असतात याचे मला भान आहे. त्यामुळे या संदर्भात अधिक चर्चा न करता योग्य कायदेशीर व नियमानुसार कारवाई केली जाईल. आमदारांना सुनावणीसाठी कधी बोलावले जाईल यावर राहुल नार्वेकरांनी प्रतिक्रिया दिली. लवकरच सुनावणी चालू करण्यात येईल. इतर प्रक्रिया सुरू आहेत. मी आश्‍वासित करतो की, यात कोणत्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही. तसेच नियमांचे पालन करून योग्य निर्णय घेतला जाईल, अशी माहिती नार्वेकरांनी दिली. शिवसेनेतील बंडखोरीनंतर बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचा विषय थेट सर्वोच्च न्यायालयात पोहचला. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दीर्घ सुनावणी घेत अपात्रतेच्या कारवाईचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवले आणि लवकरात लवकर यावर निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष कधी निर्णय घेतात, यावरच पुढील गणित अवलंबून असणार आहे.

शिवसेनेच्या आमदारांनी दिले 6 हजार पानांचे लेखी उत्तर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे लेखी उत्तर बुधवारी सादर केले आहे. त्यामुळे या प्रकरणातील घडामोडींना आता वेग आला आहे. या प्रकरणी आपण लवकरच निर्णय घेणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या आमदारांना आपली भूमिका मांडण्यासाठी नोटीस पाठली होती. विधानसभा अध्यक्षांच्या नोटीसनंतर ठाकरे गटाकडून उत्तर सादर करण्यात आले होते. पण शिंदे गटाच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्षांच्या नोटीसला उत्तर देण्यासाठी आणखी मुदत मागितली होती. त्यामुळे अपात्रतेची सुनावणी आणखी पुढे ढकलली होती. मात्र, शिवसेनेच्या आमदारांनी 6 हजार पानांचे लेखी उत्तर दिले आहे.

COMMENTS