मुंबई प्रतिनिधी - मुंबईतील मुंबादेवी मंदिरात सध्या कुठल्याही प्रकारची मास्क सक्ती भाविकांकरिता करण्यात आलेली नाही. खबरदारी म्हणून मंदिरात प्रश

मुंबई प्रतिनिधी – मुंबईतील मुंबादेवी मंदिरात सध्या कुठल्याही प्रकारची मास्क सक्ती भाविकांकरिता करण्यात आलेली नाही. खबरदारी म्हणून मंदिरात प्रशासनाने मंदिरातील पुजारी तसेच इतर कर्मचाऱ्यांना मास्क आणि अँड ग्लोव्ज देण्यात आले आहे. मंदिराच्या वतीने आम्ही देखील नागरिकांना खबरदारी म्हणून गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावे, अशी भाविकांना आम्ही विनंती करत आहोत. मात्र मास्क सक्ती नसल्याचे मंदिराचे व्यवस्थापक हेमंत जाधव यांनी म्हटले आहे.
COMMENTS