नगरमध्ये ओमायक्रान संशयित रुग्ण नाही ; अफवांवर विश्‍वास ठेवू नका- मनपा आयुक्त

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगरमध्ये ओमायक्रान संशयित रुग्ण नाही ; अफवांवर विश्‍वास ठेवू नका- मनपा आयुक्त

अहमदजनगर/प्रतिनिधी : नगर शहरात ओमायक्रॉनचा रूग्ण सापडल्याच्या आशयाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असली तरी हा संदेश चुकीचा आहे. नगर शहरात ओमायक्रॉ

पोलिस ठाण्यांतून यापुढे…नो हॅपी बर्थ डे…
आदिनाथ ढाकणे यांची नदी प्रहरी म्हणून निवड
आता जिल्ह्यात उत्सुकता…कौन बनेगा उपसरपंच

अहमदजनगर/प्रतिनिधी : नगर शहरात ओमायक्रॉनचा रूग्ण सापडल्याच्या आशयाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असली तरी हा संदेश चुकीचा आहे. नगर शहरात ओमायक्रॉनचा संशयित रुग्ण नसून नागरिकांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी केले. संबंधित रूग्ण हा परदेशी किंवा राज्याबाहेरील नाही व परदेशातून व परराज्यातून नगरला आलेला नाही. तशी यादी आरोग्य विभागाकडून तपासण्यात आली आहे. संबंधित रुग्ण हा एका खासगी लॅबमध्ये आरटीपीसीआर (करोना) पॉझिटिव्ह आलेला आहे. हा रुग्ण ओमायक्रॉन संशयित नाही. तसेच ओमायक्रॉन चाचणी देशातील मान्यताप्राप्त निवडक लॅबमध्ये आणि विशिष्ट अशा टेस्टिंग किटव्दारे होते. या रुग्णाने फक्त आरटीपीसीआर चाचणी केली आहे, असे मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांनी सांगितले.

COMMENTS