अहमदनगर प्रतिनिधी- नेवासा तालुक्यातील गेवराई येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेच्या शालेय पोषण आहाराच्या खोलीचे पत्रे उचकाटून कोणीतरी अज्ञात चोरट्या

अहमदनगर प्रतिनिधी– नेवासा तालुक्यातील गेवराई येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेच्या शालेय पोषण आहाराच्या खोलीचे पत्रे उचकाटून कोणीतरी अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला व आतील एक हजार पाचशे रुपये किमतीची भारत कंपनीची गॅसटाकी चोरून नेली.
याप्रकरणी नेवासा पोलिसांनी सौ अलका हनुमंत पाटील ( राहणार पाचेगाव तालुका नेवासा ) यांनी जिल्हा फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली. अधिक तपास पोलीस नाईक भताने करीत आहे.
COMMENTS