Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खिर्डी गणेश, अंचलगावातून विद्युत रोहीत्राची चोरी

कोपरगाव तालुका ः कोपरगाव तालुक्यातील येसगाव कक्ष अंतर्गत येणार्‍या खिर्डी गणेश येथून एक व  अंचलगाव येथून दोन विद्युत रोहिञांसह विहीरीतील मोटारीं

शहाजापूर येथे टाळ मृदुंगाच्या गजरात गणपती विसर्जन
अकोल्यात काँगे्रस खासदार धीरज साहू विरोधात आंदोलन
विद्यानिकेतन अकॅडमी आयोजित फूड फेस्टिवलला उत्स्फूर्त प्रतिसाद

कोपरगाव तालुका ः कोपरगाव तालुक्यातील येसगाव कक्ष अंतर्गत येणार्‍या खिर्डी गणेश येथून एक व  अंचलगाव येथून दोन विद्युत रोहिञांसह विहीरीतील मोटारीं चोरीला गेल्या असून चार दिवसात तीन ट्रान्सफॉर्मर चोरीला गेल्याने पोलिसांनी या भागात सक्रीय असलेल्या या चोरांच्या टोळीचा बंदोबस्त करावा अशी मागणी  शेतकर्‍यांनी केली असुन कोपरगांव  तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात फिर्याद दाखल केली आहे.
 अंचलगाव येथे सर्व्हे नंबर 81 मधील शेतकरी नितीन श्यामराव भोरकडे यांच्या शेतातील  25 केव्हिए चा एक व सर्व्हे नंबर 137 मधील सोमनाथ विठ्ठल मोरे यांच्या शेतातील  25 केव्हिए चा एक असे दोन व खिर्डी गणेश येथिल सर्व्हे नंबर 113 मधील ज्ञानदेव चांदर यांच्या   शेतातील  25 केव्हिए चा एक असे तीन दिवसात तीन  विद्युत रोहित्र फोडण्यात आले. यात मॅग्नेट, आँईल काँयल, चोरी गेले आहे तशी कोपरगांव पोलिस स्टेशनला येसगाव कक्षाचे वरिष्ठ तंञज्ञ निलेश सर्जेराव भाकरे यांनी फिर्याद दिली आहे. दरम्यान अंचलगाव शिवारातील युवराज मराठे,बाळू घोरपडे,अशोक कापसे यांच्या विहिरीतील विद्युत मोटारी चोरट्यांनी चोरुन नेल्या .आता सध्या शेतीमध्ये सोयाबीन, कपाशी, मका ही पिके उभी आहेत. पावसाने उघड दिल्याने पिक पाण्यावर आली आहेत. चोरट्यांनी असा डल्ला मारल्यामुळे शेतकर्‍यां समोर अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहे.  या भागात विद्युत मोटारी स्टँटर केबल शेतकर्‍यांचे पाईप आदी चोरीचे सत्र सुरू आहे. या चोरट्यांचा कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनने बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातून शेतकर्‍यांनी केली आहे.

COMMENTS