Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सांगलीच्या कर्नाळ रोड दत्त नगरमध्ये चोरी

दागिने व दोन लाखाची रोकड लंपास

सांगली प्रतिनिधी - सांगली शहरातील कर्नाळ रोड येथील दत्तनगर मध्ये आशिष चिंचवाडे यांच्या बंगल्यात धाडसी चोरी करण्यात आली आहे. यामध्ये बंगल्याचे म

पाटण तालुक्यात पत्रकार दिनी ऊसतोड मजुरांच्या बालकांना खाऊ वाटप
जायनावाडी बिताका गावात राबवली स्वच्छता मोहीम
समंथा ‘या’ आजाराने त्रस्त?

सांगली प्रतिनिधी – सांगली शहरातील कर्नाळ रोड येथील दत्तनगर मध्ये आशिष चिंचवाडे यांच्या बंगल्यात धाडसी चोरी करण्यात आली आहे. यामध्ये बंगल्याचे मालक आशिष चिंचवाडे यांचे हातपाय बांधून त्यांच्या आईच्या गळ्यातील सव्वा आठ तोळे सोन्याचे दागिने आणि कपाटामधील 100 ग्रॅम चांदी व दोन लाखाची रोकड असा ऐवज अज्ञात चोरट्यानी लंपास केला. मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास हा चोरीचा प्रकार घडला आहे . या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळावर भेट देऊन पाहणी केली आहे . या चोरीनंतर सांगली शहर पोलिसांनी तीन पथक रवाना केली असून त्या पथकाद्वारे चोट्यांचा माग काढला जात आहे . घटनास्थळी पोलीस अधीक्षक बसवराज तेली , उपअधीक्षक अजित टिके यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यांनी भेट दिली आहे त्याच पद्धतीने या चोरीचा तपास जलद गतीने करण्याच्या सूचनाही पोलीस अधीक्षकांनी शहर पोलिसांना दिल्या आहेत

COMMENTS