Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जालन्याच्या ’मत्स्योदरी’ देवीच्या मंदिरात चोरी

जालना : जालना जिल्ह्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रसिद्ध अंबडच्या मत्स्योदरी देवीची दानपेटी फोडून चोरट्यांनी रोख रक्कम पळवल्याची

चक्क चोरट्यांनी दानपेटीच केली लंपास; घटना CCTVमध्ये कैद.
पनवेलमध्ये ज्वेलर्सच्या दुकानाला पाडले भगदाड !
ड्रायव्हिंग स्कुलमधून रोख रक्कम घेवुन चोरटे फरार

जालना : जालना जिल्ह्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रसिद्ध अंबडच्या मत्स्योदरी देवीची दानपेटी फोडून चोरट्यांनी रोख रक्कम पळवल्याची घटना उघडकीस आली आहे.  हा प्रकार उघड होताच भाविकांना मोठा धक्का बसला आहे. घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झाले असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. जालना जिल्ह्यातील अंबडच्या मत्स्योदरी देवीच्या मंदिराच्या मुख्य गाभार्‍यात मत्स्योदरी देवीच्या पुढेच असलेली दानपेटी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी फोडली आहे. सकाळी 6 वाजता पुजार्‍याने मंदिराचे दार उघडले असता हा सर्व प्रकार उघडकीस आला. पोलिस या घटनेचा तपास करत असून श्‍वान पथकाच्या साह्याने घटनास्थळाची पाहणी केली आहे.

COMMENTS