Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 लिफ्ट देणाऱ्यांकडूनच दारूसाठी पैसे मगितल्याने झालेल्या वादातून त्या तरुणाचा खून

नाशिक प्रतिनिधी - शरद पवार मार्केट ते मखमलाबाद लिंक रोड येथील नाल्यात आढळून आलेल्या व खून झालेल्या तरुणाची ओळख पटल्या नंतर त्याच्या खुनाचा उलगड

कारवाई करताना उपस्थित असलेला दाढीवाला आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया वानखेडेंचा मित्र… मलिकांचा दावा
ओबीसी राजकीयदृष्ट्या स्वतंत्र, कोणत्याही पक्षाचा बांधिल नाही!
कोविडचा धोका कमी झाल्यावर राज्यातील यात्रा, जत्रांना परवानगी : अमित देशमुख

नाशिक प्रतिनिधी – शरद पवार मार्केट ते मखमलाबाद लिंक रोड येथील नाल्यात आढळून आलेल्या व खून झालेल्या तरुणाची ओळख पटल्या नंतर त्याच्या खुनाचा उलगडा देखील अत्यंत शिताफीने आणि कुशलतेने पोलिसांनी केली आहे.दारूला पैसे मगितल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून हा खून दोघा अल्पवयीन विद्यार्थ्यांनी केल्याचे पोलीस तपासात सामोर आले आहे.मयत ऋषिकेश भालेराव असे खून झालेल्या इसमाच नाव असून तो सातपूर येथील रहिवासी होता.दोघ अल्पवयीन मूल हे आपल्या मित्राला सातपूर येथे सोडण्यासाठी गेले होते.तेथून रात्री घटनेच्या रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास परतत असताना  ऋषीकेशने त्यांच्याकडे पंचवटी परिसरातील हमालवाडी पाटा जवळ सोडा असे सांगत लिफ्ट मागितली त्यांनतर संशयित अल्पवयीन मुलांनी त्याला शरदचंद्र पवार मार्केट ते मखमलाबाद लिंक रोड येथील हमालवाडी कडे जाणाऱ्या रस्त्यावर सोडले यावेळी मयत ऋषिकेश याने लिफ्ट देणाऱ्या दोघा अल्पवयीन मुलांकडे दारू साठी पैसे मागत वाद घातला वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले आणि या हाणामारीत दोघा संशयीत अल्पवयीन मुलांनी ऋषिकेश याच्या डोक्यात दगड मारून त्याचा खून करून पळ काढला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.त्यांनतर कुठलाही पुरावा नसताना पोलिसांनी कौशल्य वापरत या खुनाचा उलगडा केला आहे.

COMMENTS