अहमदनगर/प्रतिनिधी : विहिरीवरील वीज पंप सुरू करण्याच्या वादातून पाथर्डी तालुक्यातील वडगाव येथील भागवत मारुती गर्जे (38) याचा खून करण्यात आला. डोक्यात
अहमदनगर/प्रतिनिधी : विहिरीवरील वीज पंप सुरू करण्याच्या वादातून पाथर्डी तालुक्यातील वडगाव येथील भागवत मारुती गर्जे (38) याचा खून करण्यात आला. डोक्यात धारदार शस्त्राने घाव घालून ही हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर मृतदेह विहिरीत फेकून देण्यात आला. मारेकरी युवक पसार झाला आहे. वडगाव येथील रहिवासी बडे यांची जमीन भागवत गर्जे यांच्या वडिलांनी खरेदी केली होती. बडे यांचा पुतण्या व गर्जे यांच्यामध्ये जमिनीवरुन आणि विहिरीच्या पाण्यावरुन वाद होते. हा वाद पुढे आणखी चिघळत होता. याच वादाचे पर्यावसान गर्जे यांच्या हत्येमध्ये झाले. हा वाद स्थानिक पातळीवर मिटवण्यासाठी पंचांनी प्रयत्न केले होते. त्यानंतरही बडे आणि गर्जे यांच्यात मतभेद सुरुच होते. 27 डिसेंबरला रात्री साडेबारा भागवत गर्जे हा शेताला पाणी देण्यासाठी गेला होता. वीज कनेक्शनचा फ्युज उडाल्यामुळे तो बसवून तो विहिरीवर आला होता. पोलिस या घटनेचा कसून तपास करीत आहेत. हत्या झालेल्या भागवत गर्जेला चार मुली, पत्नी व आई-वडील असा परिवार आहे.
COMMENTS