अकोला प्रतिनिधी- अकोला(Acola) येथील गांधीग्राम(Gandhigram) येथील पुर्णा नदीत एका तरुणाने उडी मारल्याची धक्कादायक घटना घडली असून या विद्यार्थ्याचा शो
अकोला प्रतिनिधी- अकोला(Acola) येथील गांधीग्राम(Gandhigram) येथील पुर्णा नदीत एका तरुणाने उडी मारल्याची धक्कादायक घटना घडली असून या विद्यार्थ्याचा शोध आपत्कालीन पथकाकडून सुरु आहे. नदी पात्रात उडी मारलेल्या तरुणाचे नाव अक्षय गजानन ताथोड(Akshay Gajanan Tathod) असे आहे. तो अकोल्यातील विश्वकर्मा नगर(Vishwakarma Nagar) मोठी उमरी येथे राहतो. नदीत उडी घेताना अक्षयने आपल्या दुचाकीसह इतर साहित्य पुलावर ठेवले आणि काही कळायच्या आत त्याने उडी मारली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच दहीहंडा पोलीस(Dahihanda Police) घटनास्थळी दाखल झाले होते. तसेच अक्षयला शोधण्यासाठी पिंजर येथील संत गाडगे बाबा आपात्कालीन पथकाला पाचारण करण्यात आले आहे.

COMMENTS