Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मळगंगा देवीच्या यात्रेला उत्साहात सुरूवात

नवसपुर्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या बगाडगाड्याच्या मिरवणूकीचा महिलांनी घेतला आनंद

निघोज प्रतिनिधी ः नवसपूर्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या बगाडगाड्याच्या मिरवणूकीचा शेकडो महिलांनी आनंद घेतला असून हजारो भाविकांनी मळगंगा देवीचा जयजयकार

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 : पुणे विभाग-एक दृष्टीक्षेप
बनावट दस्तऐवज करून प्लॉटची परस्पर विक्री, चौघांविरुद्ध गुन्हा
स्टेट बँकेचा शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना आधार : कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील

निघोज प्रतिनिधी ः नवसपूर्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या बगाडगाड्याच्या मिरवणूकीचा शेकडो महिलांनी आनंद घेतला असून हजारो भाविकांनी मळगंगा देवीचा जयजयकार करीत बगाडगाडा मिरवणूकीची शोभा वाढवली. शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या राज्याचे जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीचा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात बुधवार 1 मे पासून सुरू झाला.
पहाटे तीन ते पाच वाजेपर्यंत पुजारी गायखे कुटुंबांनी देवीची विधिवत पूजा केली. त्यानंतर संबळ वाद्यासहीत दुणगुले कुटुंबाने महाआरती केली. त्यानंतर अभिषेक करण्यात आला. पहाटे सहापासून भावीकांनी देवी दर्शनासाठी गर्दी केली होती मंदीरामध्ये दर्शन रांगेची व्यवस्था मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट व ग्रामस्थ तसेच मुंबईकर मंडळ यांनी केल्याने भावीकांना व्यवस्थीत मनोभावे देवीचे दर्शन घेता आले. पहाटे सहा ते सायंकाळीं सात पर्यंत पंचवीस हजार पेक्षा जास्त भावीकांनी दर्शन घेतल्याची नोंद झाली आहे. यावेळी असंख्य भावीकांनी गुप्तदान तसेच देणगी पावतीच्या माध्यमातून पन्नास रुपये ते पंचवीस हजार रुपये देणगी दिल्या आहेत.  यात्रेच्या निमित्ताने पहिल्याच दिवशी लाखो रुपये देणगी देत मळगंगा देवीसाठी श्रद्धा व्यक्त केली आहे.  दुपारी पाच वाजता मळगंगा मंदीरापासून बगाडगाड्याची मिरवणूक काढण्यात आली. निघोज येथील जय मल्हार देवस्थान ट्रस्टच्या लंके मंडळाला या बगाडगाड्याचा मान असून देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष पोपटराव लंके, सर्व पदाधिकारी तसेच ट्रस्टचे मार्गदर्शक बाबाजी आण्णा लंके, पांडाभाउ लंके व ट्रस्ट सचिव सचिन लंके यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनखाली या बगाडगाड्याचे मिरवणुकीचे नियोजन करण्यात येते.लंके मंडळाचे शेकडो युवक व ज्येष्ठ मंडळी या बगाडगाडा मिरवणूकीचे नियोजन करण्यासाठी परिश्रम घेत असतात.  मळगंगा मंदीर ते ग्रामपंचायत चौक तसेच देवीची हेमांडपंथी बारव अशाप्रकारे बगाडगाड्याची मिरवणूक काढण्यात आली यावेळी शेकडो महिलांनी बगाडगाड्यात बसून नवसपुर्तीचा आनंद घेतला.  किमान पन्नास हजार पेक्षा जास्त भावीकांची यावेळी उपस्थीती होती. बारवेजवळ मिरवणूक आल्यानंतर देवीला अंबीलचा नैवेद्य दाखवण्यात आला या ठिकाणी या मिरवणूकीची सांगता करण्यात आली. त्यानंतर एस टी बस स्थानक परिसरातील मळगंगा चित्रमंदिर परिसरातील प्रांगणात ग्रामस्थ, मुंबईकर मंडळ व भावीक यांच्या लोकसहभागातून लाखो भावीकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित भावीकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. बुधवार दि.1 मे रोजी सुरू झालेला यात्रा उत्सव चार दिवस सुरु असतो. सर्वाधिक गर्दीचा उच्चांक गुरुवार दि. 2 रोजी सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत देवीच्या श्रीं ची घागर मिरवणूकीत लाखो भाविक सहभागी होतात किमान पाच ते सहा लाख भाविक दर्शनासाठी यावेळी उपस्थित असतात.

COMMENTS