Homeताज्या बातम्याविदेश

जगातील सर्वात मोठ्या रॉकेटचा प्रक्षेपणानंतर हवेत स्फोट

इलॉन मस्कच्या स्पेस रिसर्च कंपनी स्पेस एक्सच्या स्टारशिप रॉकेटचा प्रक्षेपण होताच त्याचा स्फोट झाल्याचा प्रकार समोर आला आहे. स्टारशिप रॉकेटच्या हव

’टेंभू’च्या गलथान कारभाराविरोधात याचिका दाखल करणार : डी. एस. देशमुख
एअरटेलचे सर्वात स्वस्त प्लॅन्स
चांद्रयान प्रक्षेपणाचा युट्यूबवर नवा विक्रम

इलॉन मस्कच्या स्पेस रिसर्च कंपनी स्पेस एक्सच्या स्टारशिप रॉकेटचा प्रक्षेपण होताच त्याचा स्फोट झाल्याचा प्रकार समोर आला आहे. स्टारशिप रॉकेटच्या हवेत तुकडे झाल्याचं पाहायला मिळालं. हे रॉकेट प्रक्षेपित करण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता. स्टारशिप रॉकेटचे प्रक्षेपण तीन दिवसांपूर्वीच ठरले होते. मात्र, काही कारणांमुळे हे प्रक्षेपण गुरुवारी झाले. गुरुवारी संध्याकाळी स्पेस एक्सने हे रॉकेट प्रक्षेपित करताच सुरुवातीला सर्वकाही ठीक वाटत होते, परंतु कक्षेत जाण्यापूर्वी रॉकेटमध्ये एक जबरदस्त स्फोट झाला. या स्फोटामुळे रॉकेटचा हवेतच तुकडे झाले.या घटनेचे व्हिडिओही समोर येत आहेत. ज्यामध्ये हे स्पष्टपणे दिसत आहे की प्रक्षेपणानंतर हे रॉकेट जमिनीपासून खूप उंचावर पोहोचले होते. मात्र अचानक त्याचा स्फोट झाला. स्पेस एक्स कंपनीसाठी हा मोठा धक्का आहे. कारण कंपनीला या रॉकेटकडून खूप आशा होत्या

COMMENTS