कोपरगाव तालुका ः कोपरगाव पंचायत समिती सभागृहामध्ये सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठानच्या वतीने एकल महिलांच्या मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाट
कोपरगाव तालुका ः कोपरगाव पंचायत समिती सभागृहामध्ये सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठानच्या वतीने एकल महिलांच्या मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा संगीता मालकर म्हणाल्या की, गेल्या तीन वर्षांपासून केली जाणारी मदत याही वर्षी नाशिकच्या मंदा व दिनेश घोडेकर या दांपत्याने संस्थेला सतपात्री दान देऊन 130 विद्यार्थ्यांना 70 डझन वह्यांचे वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे गौरीपोळ या विद्यार्थीनीला एमबीएच्या शिक्षणासाठी लॅपटॉपचे वितरण गटशिक्षण अधिकारी शबाना शेख यांच्या हस्ते करण्यात आले.
शैक्षणिक साहित्या अभावी कुठलाही विद्यार्थी शाळाबाह्य राहायला नको हि तळमळ प्रतिष्ठानची आहे. महिलांना संबोधित करताना गटशिक्षणाधिकारी शेख म्हणाल्या की तालुक्यातील कोणत्याही विद्यार्थ्याला काहीही अडचणी आल्या तर प्रत्येक अडचण सोडवण्यासाठी मी सर्वतोपरी मदत करेन परंतु शिक्षण कोणीही अर्धवट सोडायचे नाही, शिक्षण घेऊन आपल्या ध्येयापर्यंत पोहोचायचे विद्यार्थ्यांना मिळणार्या शिष्यवृत्ती बाबत देखील त्यांनी मार्गदर्शन केले. लॅपटॉप मिळाल्यानंतर गौरी पोळा ही विद्यार्थिनी म्हणाली की मला माझ्या ध्येयाच्या दिशेने जाण्याची प्रेरणा सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठान मुळे मिळाली. याप्रसंगी लायन्स क्लबचे नवनियुक्त अध्यक्ष मनोज कडू सचिव डॉ.तुषार गलांडे डॉ.विजय क्षीरसागर डॉ.अंकित कृष्णानी ढळीी च्या समुपदेशक कविता निकम अॅड वैशाली झाल्टे, बाल संरक्षण अधिकारी अधिकारी विकास बागुल आदी मान्यवर उपस्थित होते त्यावेळी प्रतिष्ठानच्या गीता रासकर, छाया गिरमे, सुनिता ससाने उपस्थित होत्या या वेळी स्वाती मुळे यांनी सर्व उपस्थितांचे व देणगीदारांचे आभार मानले. शालेय साहित्याची मदत मिळाल्याने विद्यार्थ्यांना आनंदाची समाधानाची भावना निर्माण झाली होती.
COMMENTS