Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ज्योती पतसंस्थेचे कार्य कौतुकास्पद – पोलिस निरीक्षक देसले

कोपरगाव प्रतिनिधी - सहकारी पतसंस्था चळवळीत काम करताना ज्योती सहकारी पतसंस्थेचा विकासाचा आलेख उंचावत गेला. सर्वसामान्य जनतेला आर्थिक पाठबळ देण्याच

दुकानमालकाकडून ६ लाखांची फसवणूक : कर्जतमधील प्रकार ; गुन्हा दाखल
शेवगाव तहसीलमध्ये शेतकर्‍यांचे शिवपाणंद रस्तेप्रश्‍नी आंदोलन
बोठेशी संबंधित ‘त्या’ फोनचा फॉरेन्सिक अहवाल प्रतीक्षेत

कोपरगाव प्रतिनिधी – सहकारी पतसंस्था चळवळीत काम करताना ज्योती सहकारी पतसंस्थेचा विकासाचा आलेख उंचावत गेला. सर्वसामान्य जनतेला आर्थिक पाठबळ देण्याचे काम पतसंस्थेचे अध्यक्ष अड रविंद्र बोरावके व त्यांच्या सहकार्यांनी मोठ्या प्रमाणात केले असल्याचे गौरवोद्गार कोपरगांव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी व्यक्त केले आहे.  
राज्यात नावलौकिक असलेली ज्योती सहकारी पतसंस्थेची दिनदर्शिका 2023 चे प्रकाशन कोपरगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या शुभहस्ते करण्यात आले त्याप्रसंगी देसले बोलत होते. ज्योती पतसंस्थेच्या यशस्वी वाटचालीस शुभेच्छा देवुन वासुदेव देसले पुढे बोलतांना म्हणाले की, ज्योती पतसंस्थेने अल्पावधीत दैनंदिन व्यवहार, ठेवी, कर्ज पुरवठा यामध्ये नियोजनबध्द कार्य केल्यामुळे ही संस्था अनेक पतसंस्थांसमोर एक आदर्श निर्माण करत असुन पतसंस्थेचे कार्य कौतुकास्पद आहे. पतसंस्थेने कोरोना काळात सामाजिक बांधिलकी जपत विविध कामांवर भर दिला असल्याचे शेवटी दसले म्हणाले. संस्था ऑनलाइन व्यवहार करीत आहे. डिडी काढणे, आरटीजीएस, एनईएफटी च्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करणे, लाकर्स , सोनेतारण कर्ज, एस.एम.एस.सुविधा, मोबाईल बँकिग, कोअर बँकिंग, बी.बी.पी.एस, क्यु.आर. कोड, कलेक्शन सुविधा आदि विविध सुविधांसह शेतकरी बांधवांसाठी त्वरीत कमीतकमी व्याजदराने सोने तारण कर्ज उपलब्ध असुन पतसंस्थेची आर्थिक स्थिती पुढीलप्रमाणे ठेवी – 275 कोटी, कर्ज – 165 कोटी, गुंतवणूक 124 कोटी, स्वनिधी 22 कोटी,  नेट एन.पी.ए. शुन्य टक्के असुन संस्थेचा सतत आडीट वर्ग अ आहे. यावेळी अड रवींद्र बोरावके चेअरमन, देवराम सजन व्हा.चेअरमन, प्रभाकर पाटील मार्गदर्शक संचालक, मच्छिंद्र पठाडे संचालक, चंद्रशेखर भोंगळे संचालक, वाल्मीक भास्कर संचालक, महिंद्र नवले संचालक, कारभारी जुंधारे संचालक, तेजस्वी बोरावके संचालिका, राजेंद्र बोरावके संचालक, कविता बोरावके संचालिका, साधना आहेर संचालिका, दिलीप रांधवणे सर व्यवस्थापक, सुनील शिरसागर सह व्यवस्थापक, दैनिक जनसंजीवनीचे व्यवस्थापक स्वप्ना जाधव यांच्यासह संस्थेचे सभासद, ठेवीदार, कर्जदार, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS