Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

करहर-महू रस्त्यावर साईड पट्ट्या भरण्याचे काम जोमात

करहर : पाचवड-पांचगणी मार्गावर करहर-महु दरम्यान साईड पट्या भरण्याचे सुरु असलेले काम. करहर / वार्ताहर : पाचगणी-पाचवड मार्गावरील करहर ते महू बस थांब्

सिल्व्हर ओकवरील हल्ला पूर्व नियोजित कट : ना. जयंत पाटील
*LokNews24 : अंगावर थुंकल्याच्या रागातून ‘त्या’ महिलेचा तरुणाने केला खून l पहा LokNews24*
म्हसवडमध्ये श्री सिध्दनाथांचे अतिकडक असे उभ्या नवरात्राचे व्रत सुरु

करहर / वार्ताहर : पाचगणी-पाचवड मार्गावरील करहर ते महू बस थांब्यापर्यंत साईड पट्ट्या भरण्याचे काम जोरात सूरु असल्याने काही अंशी वाहन चालकांना दिलासा मिळाला. तरीही महू ते काटवलीपर्यंत साईड पट्ट्या अजून अरुंद असल्याने त्याही लवकर भरून घेतल्यास पांचगणी-पाचवड मार्गावरील वाहतूक सुसाट होण्यास मदत होणार आहे.
पांचगणी-पाचवड हा मुख्य रस्ता वाई तालुक्यात पाचवड येथे सुरू होऊन जावळी तालुक्यातुन पुढे महाबळेश्‍वर तालुक्यातील पांचगणीपर्यंत जातो. अलीकडे पर्यटनाच्या दृष्टीने या रस्त्याने पांचगणीला जाणार्‍या पर्यटकांची संख्या वाढत आहे. करहर ते काटवली दरम्यान रस्ता अरुंद असल्याने अनेकदा अपघातांना निमंत्रण मिळत होते. याकरिता अनेक दिवसांपासून साईड पट्ट्या भरण्याची मागणी होत होती.
अखेर करहर ते महू दरम्यान साईड पट्ट्या भरण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे वाहन चालकांची काही अंशी सुटका होणार आहे. उर्वरित महू ते काटवली दरम्यान साईड पट्ट्या भरल्यास संपूर्ण पाचवड ते पांचगणी असा 27 किलोमीटर साईड पट्ट्या युक्त रस्ता पूर्ण होईल. हा रस्ता पूर्ण झाल्यास महू धरण या स्थळाला अधिक महत्त्व प्राप्त होणार आहे. धरणापासून काटवलीपर्यंत रस्ता खुपच अरुंद आहे. यासाईड पट्ट्या लवकर भरल्या जाव्यात, अशी मागणी जोर धरीत आहे. करहर ते काटवली दरम्यान साईड पट्या खचल्या होत्या. त्यामुळे अनेकदा दोन वाहनांना रस्ता अरुंद असल्याने अपघात घडले आहेत. आता करहर ते महूपर्यंत साईड पट्ट्या भरल्याने काही प्रमाणात प्रवासात सुखदायी होणार आहे.

COMMENTS