युद्धामुळे खाद्यतेलाच्या किंमती महागण्याची शक्यता

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

युद्धामुळे खाद्यतेलाच्या किंमती महागण्याची शक्यता

नवी दिल्ली/प्रतिनिधी : रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक पातळीवर महत्वाची उलथापालथ होणार असून, भारतात युद्धामुळे खाद्यतेलाच्या किंमती महागण्याची शक्यत

रोहित पवारांना पुन्हा संधी द्या : मनीष सिसोदिया
अभिनेता विवेक ओबेरॉयची कोट्यावधींची फसवणूक
भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांचा आमदार काळेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

नवी दिल्ली/प्रतिनिधी : रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक पातळीवर महत्वाची उलथापालथ होणार असून, भारतात युद्धामुळे खाद्यतेलाच्या किंमती महागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. विशेषत: सूर्यफूल तेल, व्यापारी आणि सॉल्व्हेंट उत्पादकांनी हा इशारा दिला आहे. पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे किमती वाढत जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
भारताकडून कच्चे सूर्यफूल तेलाचे आयत पूर्वीच्या सोव्हियत प्रजासत्ताकाकडून करण्यात येत होते. नोव्हेंबर-ऑक्टोबर (तेल पुरवठा वर्ष) 2020-21 साठी भारताने एकूण 18.93 लाख टन कच्चं सूर्यफूल तेल आयात केले होते. यापैकी 13.97 लाख टन एकट्या युक्रेनमधून होते. अर्जेंटिना (2.24 लाख टन) आणि रशिया (2.22 लाख टन) हे इतर प्रमुख पुरवठादार आहेत परंतु आकडेवारीनुसार युक्रेन हा भारताला एकमेव प्रमुख पुरवठादार आहे. मात्र युद्धामुळे ही आयात थांबणार असल्यामुळे खाद्यतेलांच्या किंमती पुन्हा एकदा महागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. खाद्यतेल उत्पादकांची सर्वोच्च संस्था मानल्या जाणार्‍या सॉल्व्हेंट अँड एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष अतुल चतुर्वेदी म्हणाले की किमती वाढत जाण्याची अपेक्षा आहे. सूर्यफूल तेल युक्रेन आणि रशियामधून येते आणि त्याची पुरवठा साखळी विस्कळीत होईल. आम्ही दरमहा सुमारे 2 लाख मेट्रिक टन सूर्यफूल तेल आयात करतो, चतुर्वेदी म्हणाले. हे युद्ध अशा वेळी आले आहे जेव्हा देशांतर्गत बाजारपेठेत खाद्यतेलाची चलनवाढ ही मोठी चिंता आहे.केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या किंमत निरीक्षण कक्षानुसार किरकोळ बाजारात रिफाइंड सूर्यफूल तेलाची किंमत 145.3 प्रतिलीटरच्या तुलनेत.161.94 रुपये प्रतिलीटरपर्यंत वाढली आहे. पुरवठा साखळीतील व्यत्ययामुळे किमतीत लक्षणीय वाढ होऊ शकते.

2014 नंतर प्रथमच खनिज तेलाचे भाव 100 डॉलर प्रति बैरल पार
युक्रेनमध्ये लष्करी कारवाईची घोषणा केल्यानंतर जागतिक कच्च्या तेलाच्या आणि सोन्याच्या किमती वाढल्या. युक्रेन-रशिया युद्धात अलिकडच्या आठवडयात वाढलेल्या तेलाच्या किमती 2014 नंतर प्रथमच ब्रेंट फ्युचर्समध्ये 100 डॉलर प्रति बैरलच्या पुढे गेल्या आहेत कारण व्यापार्‍यांनी रशियाच्या कच्च्या तेलाच्या निर्यातीला आणखी निर्बंध येण्याची भीती वाटत होती. ब्रेंट क्रूड ऑइल फ्युचर्स सकाळी आशियाई व्यापारात 99.72 डॉलर प्रति बैरलच्या वर तीन टक्क्यांनी वाढले.

COMMENTS