ग्रामस्थांनी रस्त्याच्या प्रश्नासंदर्भात खासदारांची अडवली गाडी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ग्रामस्थांनी रस्त्याच्या प्रश्नासंदर्भात खासदारांची अडवली गाडी

मी माझ्या परीने रस्ता करून देण्याचे विखेंचे आश्वासन

शेवगाव प्रतिनिधी - अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अतिदुर्गम असणाऱ्या बाडगव्हाण या छोट्याशा गावातील शालेय विद्यार्थ्यांना बाल

कर्जत- जामखेडमधील लोकांचे व्यक्तिस्वातंत्र्य धोक्यात.. खा. सुजय विखे
जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा होणार सन्मान
आमिषे दाखवून मतदारांना भुलवायचे आणि निवडणूक जिंकायची !

शेवगाव प्रतिनिधी – अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अतिदुर्गम असणाऱ्या बाडगव्हाण या छोट्याशा गावातील शालेय विद्यार्थ्यांना बालमटाकळी येथील शाळेत येण्या-जाण्यासाठी चिखल तुडवत जावे  लागते , रस्त्याची मोठी अडचण निर्माण होत असून आतापर्यंत आमदार ,जिल्हा परिषद निधी यामधून दोन किलो  मिटर रस्त्याचे काम झाले आहे. परंतु अहमदनगर दक्षिणचे खासदार सुजय विखे पाटील(Sujay Vikhe Patil) यांना एक किलोमीटर रस्त्या संदर्भात निवेदन दिले परंतु निधी उपलब्ध होत नसल्याचे कारण सांगून मी माझ्या परीने रस्ता करून देईन असे खासदार यांनी  सांगितले . परंतु जमलेल्या ग्रामस्थांची निव्वळ थट्टाच केली असून आमच्या भागाचे खासदार असून देखील रस्त्याचे प्रश्न सुटत नाहीत मग आम्ही केलेल्या मतदानाचं काय ,मतदान फुकट गेले की काय अशी संतप्त भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे, यावेळी शिवाजी कदम ,किशोर गरुड, बाळासाहेब गरुड, अभिमान शेळके ,रामकिसन काजळे दीपक गाडे भागवत भोसले ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS