Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पंढरीच्या वारीला लाभली तीनशे वर्षांची अखंड पायी दिंडीची परंपरा  

 देवळाली प्रवरा/प्रतिनिधीः  प्रति पंढरपूर म्हणून परिचित असलेल्या श्रीक्षेत्र ताहाराबाद येथील श्री संतकवी महिपती महाराजांचे वडील दादोपंत यांच्यापा

नेवासा तालुका जिल्हा परिषद सेवा निवृत्त कर्मचारी संघटनेच्या उपाध्यक्षपदी “भारतपुरी गोसावी” यांची निवड
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत न दिल्यास आंदोलन छेडणार
ऑक्सिजन देणाऱ्या वृक्ष लागवडीसाठी लोकचळवळ निर्माण व्हावी :- फिरोजभाई पठाण

 देवळाली प्रवरा/प्रतिनिधीः  प्रति पंढरपूर म्हणून परिचित असलेल्या श्रीक्षेत्र ताहाराबाद येथील श्री संतकवी महिपती महाराजांचे वडील दादोपंत यांच्यापासून ते आजतगायत पंढरीच्या वारीची 300 वर्षांची परंपरा अखंडपणे चालू आहे. दादोपंतानंतर महिपतींनी वारी चालू केली. तद्ननंतर धनाजी बाबा गागरे मांडवेकर यांनी वारीची परंपरा चालू ठेवली. त्यानंतर ब्रह्मलीन माणिकगिरीजी महाराज,नाना महाराज कांबळे, प्रभाकरअण्णा कांबळे, लहानबाबा झावरे आदींनी वारी पूर्ववत ठेवली. त्यांच्यानंतर नाना महाराज गागरे व बाळकृष्ण महाराज कांबळे यांच्या खांद्यावर वारीची पताका आहे. चालूवर्षी श्रीक्षेत्र ताहाराबाद येथून पायी दिंडी सोहळ्याचे पंढरीकडे गुरुवार,दि.15 जून रोजी प्रस्थान होणार असल्याची माहिती श्री.संत कवी महिपती महाराज देवस्थान समितीचे अध्यक्ष राजेंद्र साबळे यांनी दिली.
                  पहिला मुक्काम बारागाव नांदूर या ठिकाणी असतो. याच्यामागे आख्यायिंका आहे. महिपतींच्या वारीचा पहिला मुक्काम नांदूर येथे असायचा. तसेच महिपती महाराज वृद्धापकाळात पंढरीला जात असताना नांदूर येथील वेशीमध्ये अश्‍वावरून पडले. महिपतींच्या बरोबर असलेल्या वारकर्‍यांनी महाराजांना परत ताहाराबाद क्षेत्री आणले. पांडुरंगाच्या भेटीत खंड पडू नये म्हणून महिपतींनी पांडुरंगास वारकर्‍यांकरवी पत्र पाठवून आषाढ वैद्य नवमीस ताहाराबाद येथे येण्याचे निमंत्रण दिले. तेव्हापासून पांडुरंग महिपतींच्या भेटीस येत असतात.इ.स.1790 च्या पूर्वार्धात ही घटना घडली! पांडुरंग व महिपतींच्या ह्या भेटीला अहमदनगर जिल्ह्यात ‘पांडुरंग महोत्सव’अर्थात ‘गोपालकाला’असे म्हणतात.
      बारागाव नांदूर येथील ग्रामस्थांनी इ.स.1790 पासून ते आजतगायत पायी दिंडी सोहळ्यातील वारकर्‍यांची सेवा मनोभावे केली व करत आहे. ह्या  सेवेच्या स्मरणार्थ महिपती महाराज ज्या ठिकाणी अश्‍वावरून पडले, त्या पवित्र स्थानी बारागाव नांदूर पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी दिव्य -भव्य अशी, महिपतींच्या नावाने कमान उभारली आहे! राहुरी तालुक्याच्या इतिहासात ही ऐतिहासिक घटना म्हणून नोंद होईल. ह्या कमानीमुळे भाविकांचा आनंद द्विगुणित झाला! श्री संत कवी महिपती महाराज देवस्थान समितीचे  अध्यक्ष राजेंद्र साबळे व उपाध्यक्ष अविनाश कांबळे,ज्येष्ठ विश्‍वस्त आसाराम ढूस, मच्छिंद्र कोहकडे तसेच सर्व विश्‍वस्तांनी नांदूर ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले.

COMMENTS