विहिरीचे काम करत असताना परप्रांतीय पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विहिरीचे काम करत असताना परप्रांतीय पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

कोपरगाव शहर प्रतिनिधी : कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपुर भागात शेतात नवीन विहिरीचे खोदकाम सुरू असताना  कामावर असलेल्या परप्रांतीय मजुरांच्या टोळीतील पती

स्त्रियांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी स्वतंत्र व्यासपीठाची गरज -कविताताई आव्हाड
देवाला कोंडण्याचे पाप सरकार करीत आहे ; भाजपचा आरोप
चापडगावमध्ये धनगर आरक्षण आंदोलन पेटले

कोपरगाव शहर प्रतिनिधी : कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपुर भागात शेतात नवीन विहिरीचे खोदकाम सुरू असताना  कामावर असलेल्या परप्रांतीय मजुरांच्या टोळीतील पती-पत्नीचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र दुःखाचे वातावरण पसरले आहे.
सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील मुर्शतपुर गावातील शेत गट नंबर ८५/१ शेतात नवीन विहिरीचे खोदकाम सुरू असताना या कामावर असलेल्या परप्रांतीय मजुरांच्या टोळीमध्ये जेठालाल जगु भिल्ल व शांती जेठालाल भिल्ल हे  राजस्थान प्रातांतील पतीपत्नी रविवारी सदर विहिरीचे खोदकाम करण्यासाठी विहिरीवरील क्रेनच्या ट्रॉली मध्ये बसून विहिरीत उतरत असताना क्रेन मध्ये अचानकपणे  तांत्रिक बिघाड होऊन वायर तुटल्याने ट्रॉली विहिरीत खोलवर पडली असता त्या विहिरी तील दगडांचा व खडकाचा मोठ्या प्रमाणात त्यांना मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला असून सदर घटनेची माहिती  कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांना मिळताच त्यांनी तत्काळ आपल्या  पथकासह घटनास्थळी भेट देत दोन्ही मृतदेह स्थानिकांच्या मदतीने विहिरीतून वर काढत कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले असून  गणेश राहणे रा येसगाव यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.  

COMMENTS