Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ट्रकने अभिनेत्रीच्या कारला धडक दिली

टीव्ही अभिनेत्री हेतल यादव च्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. टीव्हीवरील प्रसिद्ध शो इमली मध्ये शिवानी राणाची भूमिका साकारणाऱ्या

हरियाणात एससी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा निर्णय
गहूनंतर साखरेच्या निर्यातीवर बंदी
पुणे शहरात तब्बल 206 सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र

टीव्ही अभिनेत्री हेतल यादव च्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. टीव्हीवरील प्रसिद्ध शो इमली मध्ये शिवानी राणाची भूमिका साकारणाऱ्या हेतलचा कार अपघात झाला. रविवारी रात्री शूटिंगवरून घरी परतत असताना हेतल च्या कारला ट्रकने धडक दिली. मात्र, घाबरण्याचे काही कारण नाही, हेतल सुरक्षित आहे. हेतल यादवने सांगितले मी रात्री 8.45 च्या सुमारास पॅकअप केले, त्यानंतर मी फिल्मसिटीहून घराकडे निघाले. मी JVLR महामार्गावर पोहोचताच एका ट्रकने माझ्या कारला मागून धडक दिली. ट्रकने माझी कार काठावर ढकलली. माझी गाडी पडणार होती. कसेतरी, हिंमत करून मी गाडी थांबवली आणि माझ्या मुलाला कॉल केला. या घटनेनंतर मी माझ्या मुलाला याबाबत पोलिसांना कळवण्यास सांगितले.

COMMENTS