Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रजासत्ताक दिनी मानवधन संस्थेत शहीद पुत्राच्या वीरमातेच्या हस्ते फडकवला तिरंगा

नाशिक प्रतिनिधी  - देशासाठी प्राण गमावलेल्या वीरांचे बलिदान अतुलनीय आहे. आपण केवळ त्यांचे ऋणी राहू शकतो. याच कृतज्ञ भावनेतून प्रजासत्ताक दिनी मान

महावितरणचा महादिलासा : उच्चांकी मागणीएवढा अखंडित वीजपुरवठा
दत्तक उद्याने पुन्हा निराधार
सूनेकडून सेवानिवृत्त पोलीस सासर्‍याला जीवे मारण्याचा प्रयत्न| LOKNews24

नाशिक प्रतिनिधी  – देशासाठी प्राण गमावलेल्या वीरांचे बलिदान अतुलनीय आहे. आपण केवळ त्यांचे ऋणी राहू शकतो. याच कृतज्ञ भावनेतून प्रजासत्ताक दिनी मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था नाशिक, धनलक्ष्मी शाळा व प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मिडीअम स्कूल, पाथर्डी फाटा, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर व भव्य राष्ट्रभक्तिपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. धनलक्ष्मी शाळेमध्ये शहीद सैनिकाची वीर माता सिमी निनान यांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला. तसेच संस्थेच्या वतीने देशकार्यास्तव रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ब्ल्यू क्राॅस लेबोरेट्री या संस्थेचे माजी महाव्यवस्थापक

संजीव माहुली, माजी कर्नल प्रमोद निनान व सिमी निनान, मानवधन संस्थेचे संस्थापक प्रकाश कोल्हे, संस्था सचिव तथा शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती कोल्हे, मुख्या. सुरेखा निकम, मुख्या. वैशाली पवार, उपमुख्या. पूनम पाटील, मुख्या. वसुंधरा चटर्जी आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. प्रतिवर्षी स्वातंत्र्यवीरांच्या आठवणींना व कार्याला उजाळा देण्यासाठी तसेच देशभक्तांच्या  सन्मानार्थ १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन तसेच २६ जानेवारी गणतंत्र दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. राज्य रक्त संक्रमण परिषद विभागीय संदर्भ सेवा रूग्णालय, नाशिक यांच्या सहकार्याने मानवधन संस्थेने व रक्तदात्यांनी श्रेष्ठ रक्तदानाचे कार्य केले.

      उपस्थितांना संबोधित करत प्रकाश कोल्हे यांनी सांगितले की, ‘या महान देश कार्यात व मानव सेवेच्या या व्रतात  रक्तदान करून एक आदर्श निर्माण केला त्या देशभक्तांच्या ऋणात सदैव असेन! प्रजासत्ताक राष्ट्रात जगताना आपण नागरिक या नात्याने आपली कर्तव्ये व जबाबदारी समजून घेणे महत्त्वाचे आहे. लोकशाही शिक्षणाचा पाया हाच राष्ट्र निर्माणाचा आधार आहे.’ अध्यक्षीय भाषणात मा. कर्नल निनान यांनी देशासाठी आपला प्रत्येक श्वास असावा, असे प्रतिपादन केले.

        विविध देशभक्तीपर कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धूरा दीप्ती पाटील यांनी सांभाळली. आभार प्रदर्शन मोसीना शेख यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका वैशाली पवार यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. सोबतच संस्था संचलित शाळांमधील व सर्व शाळांमधील शिक्षकवृंद, मानवसेवक यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

COMMENTS