अहमदनगर/प्रतिनिधी : जिल्हा परिषद कर्मचार्यांच्या बदल्यांची प्रक्रिया चक्क गुरूवारी (19 मे) मध्यरात्री 12 पर्यंत सुरू होती. खुद्द मुख्य कार्यकारी अधि
अहमदनगर/प्रतिनिधी : जिल्हा परिषद कर्मचार्यांच्या बदल्यांची प्रक्रिया चक्क गुरूवारी (19 मे) मध्यरात्री 12 पर्यंत सुरू होती. खुद्द मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी उपस्थित ही प्रक्रिया मार्गी लावली. यात जिल्हा परिषदेच्या इतिहासातील आतापर्यंत सर्वाधिक 290 कर्मचार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात 122 प्रशासकीय, 132 विनंती व 36 आपसी कर्मचार्यांच्या बदल्यांचा समावेश आहे. सामान्य प्रशासन विभाग आणि त्यांच्या पथकाने ही सर्व प्रक्रिया पार पडली.
सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी संदीप कोहीणकर यांच्या नियोजनानुसार मंगळवार (दि.17) पासून कर्मचार्यांच्या बदल्यांना सुरुवात झाली होती. पहिल्या दिवशी अर्थ विभागापासून सुरू झालेल्या बदल्याची प्रक्रिया सर्वात मोठे केडर असणार्या ग्रामसेवकांच्या बदल्यांनी समाप्त झाली. यासाठी गुरुवारी रात्री 12 वाजले. विभागनिहाय झालेल्या बदल्यांमध्ये सामान्य प्रशासन विभागात सहायक प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, वरिष्ठ सहायक यांच्या 1 प्रशासकीय आणि 7 विनंती तर 3 विनंती, कनिष्ठ सहायकांच्या 6 प्रशासकीय प्रशासन अधिकारी यांची 1 विनंती, कनिष्ठ प्रशासन अधिकारी यांची 1 विनंती, वरिष्ठ सहायकांच्या 7, कनिष्ठ सहायकांच्या 21 विनंती, तर कनिष्ठ सहायकांच्या 8 आपसी या 51 कर्मचार्यांच्या बदल्या करण्यात आल्या. अर्थ विभागातील सहायक लेखाधिकारी 1 प्रशासकीय, कनिष्ठ लेखाधिकारी 1 प्रशासकीय, वरिष्ठ सहायक लेखा 1 प्रशासकीय आणि 1 विनंती, कनिष्ठ सहायक लेखाच्या 1 प्रशासकीय आणि 1 विनंती. कृषी विभागातील कृषी अधिकारी 1 प्रशासकीय, 1 विनंती, विस्तार अधिकारी यांची 1 प्रशासकीय आणि 2 विनंती बदल्या करण्यात आल्या. महिला बालकल्याण विभागातील पर्यवेक्षिकांची 2 प्रशासकीय आणि 6 विनंती तर एक आपसी. ग्रामीण पाणी पुरवठा विभागात कनिष्ठ शाखा अभियंता 1 प्रशासकीय आणि 1 विनंती. लघु पाटबंधारे विभागातील कनिष्ठ शाखा अभियंता स्थापत्य 1 प्रशासकीय आणि 1 विनंती. बांधकाम (उत्तर) विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी सहायक 1 प्रशासकीय आणि 3 विनंती, कनिष्ठ अभियंता यांची 2 प्रशासकीय आणि 3 विनंती, तर 4 आपासी, पशुसंवर्धन विभागातील सहायक पशुधन विकास अधिकारी 1 प्रशासकीय, पशुधन पर्यवेक्षक 1 प्रशासकीय आणि 15 विनंती बदल्या करण्यात आला. आरोग्य विभाग आरोग्य सेवक महिला 27 प्रशासकीय 8 विनंती, 5 आपसी, आरोग्य सहायक (महिला) 4 विनंती, औषध निर्माण अधिकारी 6 प्रशासकीय, 2 आपसी, आरोग्य सहायक (पुरूष) 4 प्रशासकीय, आरोग्य पर्यवेक्षक 1 प्रशासकीय, आरोग्य सेवक (पुरूष) 18 प्रशासकीय 10 विनंती, आरोग्य सेवक पुरूष पेसा बाहेर 3 प्रशासकीय, आरोग्य सेवक पुरूष पेसामध्ये 6 प्रशासकीय अशा प्रकारे आरोग्य विभागात 94 कर्मचार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. शिक्षण प्राथमिक विस्तार अधिकारी 1 प्रशासकीय 3 विनंती, केंद्र प्रमुख 1 प्रशासकीय 2 विनंती. ग्रामपंचायत विभाग विस्तार अधिकारी पंचायत 2 प्रशासकीय, 1 आपसी, विस्तार अधिकारी सांख्यिकी 1 प्रशासकीय, ग्रामविकास अधिकारी 10 प्रशासकीय 10 विनंती, ग्रामविकास अधिकारी पेसा बाहेर 1 विनंती, ग्रामविकास अधिकारी पेसामध्ये 1 विनंती, ग्रामसेवक 20 प्रशासकीय, 21 विनंती 16 आपसी, ग्रामसेवक पेसा बाहेर 6 विनंती आणि ग्रामसेवक पेसामध्ये 2 प्रशासकीय, 8 विनंती अशा प्रकारे ग्रामपंचायात विभागात 99 कर्मचार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
COMMENTS