Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सेल्फीच्या नादात दोन जीवलग मित्रांचा दुर्देवी मृत्यू

हार्दिक गुळघाने आणि आयुष चिडे अशी मृत्युमुखी पडलेल्या जीवलग मित्रांची नावे

चंद्रपूर प्रतिनिधी - चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा-चिमूर मार्गावरील चारगाव सिंचन तलावात बुडून दोन मित्रांचा मृत्यू झालाय. सेल्फीच्या नादात दोन जीवल

कोरोना तपासणीला नकार देत कर्मचाऱ्याला बसमधून पळवले (Video)
पुद्दुचेरीमधून एक धक्कादायक घटना समोर
रॅगिंगला कंटाळून मेडिकलच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

चंद्रपूर प्रतिनिधी – चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा-चिमूर मार्गावरील चारगाव सिंचन तलावात बुडून दोन मित्रांचा मृत्यू झालाय. सेल्फीच्या नादात दोन जीवलग  मित्रांनी आपला जीव गमावला. तलावाजवळ सेल्फी घेत असताना एक मित्र पाण्यात पडला, त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्याने पाण्यात उडी घेतली मात्र दोघेही बुडाले. हार्दिक गुळघाने (वय 19) आणि आयुष चिडे (वय 19) अशी मृत्युमुखी पडलेल्या जीवलग मित्रांची नावे आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मासेमारांच्या सहाय्याने दोघांनाही शोधण्याचे प्रयत्न सुरू झाले. 2 तासांच्या प्रयत्नानंतर अखेर दोन्ही मृतदेह आढळून आले. दोन जीवलग मित्रांचा एकाचवेळी पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.  

COMMENTS