Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नववर्षाच्या प्रारंभीच औंध येथे कुस्तीचा थरार

औंध / वार्ताहर : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे मान्यतेने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याची निवड चाचणी कुस्ती स्पर्धेचा

नाव गावात गव्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी
सर्वोत्कृष्ट शास्त्रज्ञांच्या यादीत डॉ. राजाराम माने
प्रोत्साहन अनुदान जमा करा; अन्यथा ठिय्या आंदोलन

औंध / वार्ताहर : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे मान्यतेने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याची निवड चाचणी कुस्ती स्पर्धेचा थरार 2 आणि 3 जानेवारीला औंध येथे श्री यमाई मंगल कार्यालय येथे रंगणार आहे. जिल्हा कुस्तीगीर संघाने आणि अंकुश भाऊ गोरे युवा मंच यांना आयोजनाची जबाबदारी दिली असल्याचे युवा उद्योजक अंकुशभाऊ गोरे यांनी सांगितले.
औंध विश्रामगृह येथे जिल्हास्तरीय कुस्ती निवड चाचणी स्पर्धेसाठी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी दोन दिवस होणार्‍या स्पर्धेची सविस्तर माहिती दिली.
वरिष्ठ राज्य अजिंक्यपद स्पर्धा म्हणजेच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा, नव्याने सुरू झालेली ग्रिको रोमन महाराष्ट्र केसरी, महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी गादी आणि माती आखाड्यात स्पर्धा होणार आहे. ग्रिको रोमन आणि महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठीची निवड चाचणी गादी गटात होणार आहे.
स्पर्धेसाठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माजी खासदार रामदास तडस, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, हिंद केसरी पै. योगेश दोडके, महाराष्ट्र केसरी बापू दादा लोखंडे, सरचिटणीस पै. धनाजी पाटील, सागर काळे, तांत्रिक समिती प्रमुख अमोल साठे यांच्यासह महाराष्ट्र केसरी, कुस्ती क्षेत्रातील नामांकित मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
खटाव-माण तालुक्याला कुस्तीची मोठी परंपरा आहे. सुर्य नमस्काराचे धडे बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांच्या माध्यमातून जगभर पोहोचले आहेत. व्यायामाची हीच परंपरा पुढे नेत, कुस्ती सारख्या खेळांना प्रोत्साहन देण्याचा हा प्रयत्न आहे. निवड चाचणीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गुणवंत मल्लांना मोठे व्यासपीठ मिळावे आणि खटाव माणच्या मातीतून नवे महाराष्ट्र केसरी घडावेत, हीच अपेक्षा असल्याचे अंकुश गोरे यांनी सांगितले.

COMMENTS