Homeताज्या बातम्यादेश

चोरट्यांनी कार चालकाला रस्त्यावर फरफटत नेले

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा 'कंझावाला'सारखी घटना घडली आहे. एका व्यक्तीला मारहाण केल्यानंतर कार चालकाने 200 मीटरपर्यंत फरफटत नेले. या

रुबिना दिलैकने दिली गुडन्यूज !
शाळेच्या इमारतीवरून कोसळून 14 वर्षाच्या मुलाचा मृत्यू
मोबाईलसाठी गळफास घेवून संपवले जीवन

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा ‘कंझावाला’सारखी घटना घडली आहे. एका व्यक्तीला मारहाण केल्यानंतर कार चालकाने 200 मीटरपर्यंत फरफटत नेले. या वेदनादायक आणि हृदयद्रावक घटनेत त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. पाठीमागून येणाऱ्या कारस्वाराने या घटनेचा व्हिडिओ शूट करुन सोशल मीडियावर शेअर केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, यानंतर पोलिसांनी तपास केला असता, हा व्हिडीओ NH8 च्या सर्व्हिस रोडचा असल्याचे आढळून आले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. ज्या व्यक्तीचा या घटनेत मृत्यू झाला, त्या व्यक्तीची ओळख पटली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील वसंत कुंज उत्तर पोलीस स्टेशन परिसरातील महिपालपूरजवळील NH 8 सर्व्हिस लाइनवर त्या व्यक्तीला सुमारे 200 मीटरपर्यंत ओढत नेले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना काल रात्री 11.30 च्या सुमारास या घटनेची माहिती मिळाली. यानंतर त्यांना NH 8 सेवा मार्गावर एक मृतदेह पडलेला आढळला. बिजेंद्र असे मृताचे नाव असून तो फरिदाबादचा रहिवासी आहे.

COMMENTS