Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

क्रिकेट सट्टयात गमावलेले पैसे चुकविण्यासाठी दागिन्यांची चोरी

दीड लाखाचे सोन्याचे दागिने कोतवाली पोलिसांकडून हस्तगत

अहमदनगर/प्रतिनिधी ः क्रिकेट सट्ट्यात पैसे हरल्यानंतर ते चुकविण्यासाठी सराफा दुकानात दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने घुसून सोन्याचे दागिने चोरणा

तरुण पिढीमध्ये विवाहपूर्व समुपदेशन आवश्यक : न्यायाधीश नेत्रा कंक यांचे प्रतिपादन
केलीफोर्निया येथील साई भक्तांचे साई चरनी 41 लाख रुपये दान
राज्यमंत्री आदिती तटकरे यांचा समाजभूषण, कर्तव्यसंपन्न ‘लेकीचा’ सन्मान सोहळा संपन्न

अहमदनगर/प्रतिनिधी ः क्रिकेट सट्ट्यात पैसे हरल्यानंतर ते चुकविण्यासाठी सराफा दुकानात दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने घुसून सोन्याचे दागिने चोरणार्‍या चोराला कोतवाली पोलिसांनी सापळा रचून शिताफीने गजाआड केले आहे.त्याच्या कडून दीड लाख रुपये किमतीचे दागिने जप्त केले. ही कारवाई कोतवाली पोलिसांनी माळीवाडा येथील हाजी सुलेमान बिल्डिंग येथे केली.
याबाबतची माहिती अशी की टिळक रोडवरील शिंगवी ज्वेलर्स मध्ये 22 ऑगस्ट रोजी दागिने खरेदीसाठी आलेल्या एकाने हात चलाखीने 25 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली होती. ते  दागिने चोरणार्‍या चोरट्यास कोतवाली पोलिसांनी चोराला अटक केली असून त्याच्या कडून 1 लाख 56 हजार 550 रु किंमतीचे दागिने हस्तगत केले आहेत. कामरान सिराज शेख (वय-36 वर्षे रा. हाजी सुलेमान बिल्डींग, माळीवाडा, अ.नगर) असे आरोपीचे नाव आहे. टिळक रोडवरील शिंगवी ज्वेलर्स येथे कामरान शेख हा दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने गेला होता. दागिने पाहत असतानाच सुमारे 25 ग्रॅम वजनाचे दागिने हात चलाखीने चोरी केले होते. दागिने चोरी झाल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर शिंगवी ज्वेलर्सचे विशाल नितीन शिंगवी (वय 30 वर्षे रा.पटेलवाडी, टिळकरोड अ.नगर ) यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास सुरू असताना कोतवाली पोलिसांना माहिती मिळाली की चोरी करणारा आरोपी कामरान शेख हा माळीवाडा येथील त्याच्या घराजवळ येणार आहे. या माहितीच्या आधारे कोतवाली पोलिसांनी सापळा लावून आरोपी शेख याला ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता शेख याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर आरोपीला ताब्यात घेऊन चोरीतील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अधिक चौकशीत आरोपी शेख याने ऑनलाइन क्रिकेट सट्टा पुणे येथे खेळत होतो. मोठ्या प्रमाणावर पैसे हरलो होतो ते पैसे देण्यासाठी चोरी केल्याचे कबूल केले.  या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सचिन गायकवाड  करत आहेत.   ही कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलिस अंमलदार तनवीर शेख, योगेश भिंगारदिवे, सचिन गायकवाड, रियाज इनामदार, अमोल गाढे, सुजय हिवाळे, अतुल काजळे यांच्या पथकाने ही कारवाई केली

COMMENTS