Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भररस्त्यात टेम्पो रस्त्याच्या मधोमध पलटी

कारने अचानक ब्रेक दाबल्याने टेम्पो चालकाचा सुटला ताबा

मुलुंड प्रतिनिधी - मुलुंड पूर्व(Mulund East) द्रुतगती मार्गावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर झालेल्या विचित्र अपघातामध्ये टेम्पो चालक जखमी

प्राथमिक सुविधांच्या उपलब्धतेवर भर -राज्यमंत्री डॉ भारती पवार 
जनतेच्या प्रश्‍नांचे काय ?
शरद पवारांनीच शिवसेनेला भाजपपासून दूर केले  

मुलुंड प्रतिनिधी – मुलुंड पूर्व(Mulund East) द्रुतगती मार्गावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर झालेल्या विचित्र अपघातामध्ये टेम्पो चालक जखमी झाला आहे. त्यामुळे मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक काही काळ प्रभावित झाली होती. मुलुंडच्या म्हाडा कॉलनीच्या ब्रिज(Bridges of Mhada Colony) वरून उतरल्यानंतर एका कारने अचानक ब्रेक दाबला त्यामुळे या कार मागून येत असलेल्या टेम्पोचालकाचा टेम्पोवरील नियंत्रण सुटलं आणि हा टेम्पो रस्त्याच्या मधोमध पलटी झाला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हा टेम्पो रस्त्याच्या बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू केले तोपर्यंत वाहतूक हे सर्विस रोड वरून फिरवण्यात आली आहे.

COMMENTS