Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विधानसभा निवडणूकीसाठी यंत्रणानी सज्ज रहावे : जितेंद्र डुडी

सातारा / प्रतिनिधी : विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे. एकमेकांशी समन्वय ठेवावा. निवडणूकीशी संबधीत कामकाजाबाबत अधिकार

धारेश्‍वर दिवशी येथे गाईचे ढोहाळे जेवन कार्यक्रम थाटामाटात
लोधवडे येथे शाळा पूर्व तयारी पालक सभा उत्साहात
कृष्णा विश्‍व विद्यापीठाचा शुक्रवारी 11 वा दीक्षांत सोहळा

सातारा / प्रतिनिधी : विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे. एकमेकांशी समन्वय ठेवावा. निवडणूकीशी संबधीत कामकाजाबाबत अधिकारी, कर्मचार्‍यांना अनुषंगीक प्रशिक्षण द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले.
कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत घेतला. यावेळी पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, उपजिल्हाधिकारी निवडणूक भगवान कांबळे, उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण, विविध विभागाचे नोडल अधिकारी यांच्यासह सर्व प्रांताधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
जितेंद्र डूडी म्हणाले, निवडणूक आचार संहिता घोषित झाल्यानंतर तिचे काटेकोरपणे पालन व्हावे. यासाठी सर्व सबंधित विभागांनी आपल्याकडील मनुष्यबळाला आवश्यक ते प्रशिक्षण आतापासूनच द्यावे. प्रत्येक विधानसभा मतदार संघात कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने कामकाज पाहणार्‍या विभागांचा यामध्ये पोलीस, महसुल आरटीओ, उत्पादन शुल्क, जीएसटी यांसारख्या विभागाच्या अधिकार्‍यांचा सामावेश असणारे एक पथक कार्यरत ठेवावे. निवडणुकीच्या काळात अवैध दारु, रोख रक्कमांचा गैरवापर होणार नाही यासाठी काटेकोर दक्षता घ्यावी.

COMMENTS