Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रोग्रेसिव्ह च्या विद्यार्थ्यांनी गिरवले स्वराज्याचे धडे

नाशिक- प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल पाथर्डी फाटा येथे बाळ गंगाधर टिळक अर्थात लोकमान्य यांस विनम्र अभिवादन करीत जयंती साजरी झाली.  याप्रस

पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पाणी टंचाई आढावा बैठक
Osmanabad : हा रस्ता नेमका स्वतंत्र भारतातच आहे का?- त्रस्त नागरिकांचा सवाल
या माजी क्रिकेटरची लाखो रुपयांची फसवणूक | LOKNews24

नाशिक– प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल पाथर्डी फाटा येथे बाळ गंगाधर टिळक अर्थात लोकमान्य यांस विनम्र अभिवादन करीत जयंती साजरी झाली.  याप्रसंगी संस्थेचे संस्थापक प्रकाश कोल्हे, संस्थेच्या सचिव ज्योती कोल्हे , शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली पवार  आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिमापूजन करून विद्यार्थ्यांना ऐतिहासिक बाबींची माहिती देण्यात आली.  या राष्ट्र भक्ताची देशभक्ती, देशावरील निस्सिम आणि निस्वार्थी प्रेम, आणि आदर व्यक्त करीत स्व चे बलिदान देणारा हा  लोहपुरुष परखड लेखक आणि स्पष्टवक्ता देखील होते. त्यांच्यासारखे असंख्य गुण विद्यार्थ्यांनी अंगीकृत करावे असा सल्लाही देण्यात आला. 

विद्यार्थी लोकमान्य टिळकांच्या वेशभूषेत सजले. तसेच टिळकांवरील भाषणे व्यक्त करीत, ” स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच.” असे म्हणत देशासाठी लढण्याची एक नवीन उमेद आणि प्रेरणा यांची जाणीव आणि जागृती विद्यार्थ्यांना झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीप्ती पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन अमृता पिसोळकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी सहभाग नोंदवला.

COMMENTS