Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एव्हरेस्ट अबॅकस शिरूर  शाखेच्या  विद्यार्थ्यांची  उत्तुंग भरारी 

शिरूर प्रतिनिधी  -  गुरुकृपा लॉन  या ठिकाणी  एवरेस्ट अबॅकस अकॅडमी आयोजित नॅशनल लेव्हल अबॅकस स्पर्धेमध्ये उत्स्फूर्तपणे   सहभागी होऊन स्पर्धकांनी

महापालिका लेटलतिफ 14 अधिकार्‍यांवर कारवाई
गांधींबाबत बुध्दीभेदाचे प्रयत्न हाणून पाडा : निरंजन टकले 
LokNews24 : शिवसेना दसरा मेळावा | उद्धव ठाकरे यांचे संपूर्ण भाषण अनकट

शिरूर प्रतिनिधी  –  गुरुकृपा लॉन  या ठिकाणी  एवरेस्ट अबॅकस अकॅडमी आयोजित नॅशनल लेव्हल अबॅकस स्पर्धेमध्ये उत्स्फूर्तपणे   सहभागी होऊन स्पर्धकांनी भरघोस यश संपादन केले. सर्व विजेत्या स्पर्धकांना प्रमुख पाहुणे निवासी नायब तहसीलदार स्नेहा गिरी गोसावी, गंगा एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका  कु. अमृतेश्वरी घावटे, समप्रभा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष  धनंजय  नाईक, विद्याधाम प्रशाला देवदैठण  मुख्याध्यापक बाळासाहेब दहिफळे , पत्रकार चेतन  पडवळ , शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अल्पसंख्यांक विभागाचे राजुद्दीन भाई सय्यद, या सर्व मान्यवरांच्या  हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. शिरूर मध्ये 23 वी राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा पार पडली या स्पर्धेमध्ये   शिरूर , पुणे, शिक्रापूर, कर्जत , श्रीगोंदा, टाकळी हाजी, देवदैठण, न्हावरा, नारायणगव्हाण , चास , करंदी  यासारख्या वेगवेगळ्या तालुका व गावांमधून  823 विद्यार्थी सहभागी  झाले होते. या वेळी प्रतिभा पुजारी व सुवर्णा ठोकळ  या शिक्षकांना   दुसऱ्यांदा स्टार शिक्षक  व वैशाली  लोंढे  यांना   स्टार शिक्षक   तसेच  अजित म्हस्के यांना बेस्ट शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 यावेळी अबॅकस च्या सर्व लेव्हल पूर्ण करणाऱ्या श्रावणी चौधरी या विद्यार्थिनीला  अबॅकस मास्टर ही पदवी बहाल करण्यात आली, तर चॅम्पियन म्हणून सर्वेश कोल्हे, आरोही देसाई , श्लोक खेडकर , ओम बारी , धनश्री अहिरराव, सौम्य हराळ , श्लोक कोरके , वेदिका शेजाळ, आदिराज कोलते , खोले वैष्णवी , साई खेतमाळीस, स्वराज मिडगुल, तन्मय बरशिले , आराध्या गवारे , नीरज शेळके , मनन पिंपरकर, मेघांत वैद्य , आराध्या यादव, शुभेच्छा गायकवाड, श्रावणी चौधरी या स्पर्धकांना घोषित करण्यात आले.  परीक्षेत विद्यार्थ्यांनी पाच मिनिटात  165 बेरीज आणि वजाबाकी , 137 गुणाकार, 127 भागाकार , तर 108 वर्ग संख्या सोडवल्याने पालक व मान्यवर अवाक झाले.  व्यावहारिक जीवनात गणिताला उच्चतम स्थान असून बौद्धिक स्तर वाढविण्यासाठी अबॅकस हा चांगला पर्याय असल्याचे नायब तहसीलदार गिरी गोसावी  यांनी सांगितले. या परीक्षेचा हेतू व उद्देश प्रतिभा पुजारी यांनी प्रास्ताविकातून सांगितला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रपती पुरस्कार विजेते  अमोल बागुल सर यांनी केले तर आभार प्रणिता पाटील यांनी मानले.

COMMENTS