Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेअर बाजार वधारला ; सेन्सेक्स 62 हजारांवर

मुंबई : भारतीय शेअर बाजारात गुरुवारी ऐतिहासीक उसळण दिसून आली. बँकिंग, आयटी आणि एफएमसीजी स्टॉक्समध्ये झालेल्या जोरदार खरेदीमुळे सेन्सेक्सने 62 हजा

पबजीचे व्यसन ; मुलाने केली आईसह तीन भावडांची हत्या
तीन टक्के वाढीव महागाई भत्ता तात्काळ लागू करावा-सुनील गाडगे
बदलापुरात तरुणावर तलवारीने वार

मुंबई : भारतीय शेअर बाजारात गुरुवारी ऐतिहासीक उसळण दिसून आली. बँकिंग, आयटी आणि एफएमसीजी स्टॉक्समध्ये झालेल्या जोरदार खरेदीमुळे सेन्सेक्सने 62 हजार अंकांचा टप्पा गाठला. सोबतच बँक निफ्टी निर्देशांकानेदेखील आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 762 अंकांनी वधारत 62 हजार 272 अंकांवर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीत 216 अंकांची तेजी दिसून आली. निफ्टी 18 हजार 484 अंकांवर स्थिरावला. आज दिवसभरातील व्यवहारात 1886 कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते. त्याशिवाय, 1494 कंपन्यांचे शेअर दर घसरले. त्याशिवाय, 133 कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही. शेअर बाजारात आज, गुरुवारी बँकिंग, आयटी, एफएमसीजी, एनर्जी, मेटल्स, इन्फ्रा आदी सेक्टरमधील शेअर दरात तेजी दिसून आली. बँक निफ्टीने आतापर्यंतचा उच्चांक गाठला. बँक निफ्टीने 43 हजार अंकांचा टप्पा ओलांडत 43 हजार 75 अंकांवर बंद झाला. निफ्टीतील 50 पैकी 43 कंपन्यांचे शेअर्स वधारले होते. तर, 7 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली. सेन्सेक्स निर्देशांकातील 30 कंपन्यांपैकी 26 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली.

COMMENTS